सुरेश रैनाचं क्रश मराठमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा

सुरेश रैनाचं क्रश मराठमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा

नुकताच रैनानं खुलासा केला आहे की एक मराठमोळ्या अभिनेत्रीवर त्याचं बरीच वर्षं क्रश होतं.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : भारतील क्रिकेटर सुरेश रैना मागच्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र सध्या तो त्याच्या कुटुंबाला वेळ देत आहे. सध्या तो चेन्नईमध्ये आहे जिथे IPLच्या अगोदर चेन्नई सुपर किंग्सनं आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये तो सहभागी झाला आहे. खरं तर रैना त्या खेळाडूंपैकी एक आहे जे त्याच्या कुटुंबाला खूप महत्त्व देतात.

एकीकडे क्रिकेटर अभिनेत्री किंवा मॉडेलना डेट करतात अशात रैनानं मात्र इनवेस्टमेंट बँकर प्रियांका चौधरीशी लग्न केलं. पण नुकताच रैनानं खुलासा केला आहे की एक मराठमोळ्या अभिनेत्रीवर त्याचं बरीच वर्षं क्रश होतं.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

सोनाली बेंद्रेवर होतं सुरेश रैनाला क्रश

जिंग गेम ऑन या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सुरेश रैनानं त्याच्या फर्स्ट क्रशचा खुलासा केला. रैनाला अभिनेत्री सोनाली बेंद्रे खूप आवडत असे. कॉलेजमध्ये असताना तो तिला डेट करण्याची स्वप्न पाहत असे. या शोमध्ये रैनाला सोनालीकडून आलेला एक खास मेसेज सुद्धा ऐकवण्यात आला. ज्यामुळे तो खूप खूश झाला. काही महिन्यांपूर्वी सोनाली कॅन्सरशी झगडत होती त्यावेळी रैनानंही तिला एक मेसेज पाठवला होता. सोनालीनं ‘सर्फरोश’, ‘हम साथ साथ है’, ‘दिलजले’ यासारख्या बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे.

शरद पवारांच्या भूमिकेत सुबोध दिसणार? बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा

 

View this post on Instagram

 

❤️❄️

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

या शोमध्ये रैनानं सांगितलं की, त्याची 4 वर्षांची मुलगी ग्रासिया त्याच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. रैना म्हणाला, माझी मुलगी माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. तिच्या येण्यानं माझं पूर्ण आयुष्य बदललं. मी तिच्यासोबत फार थोडा वेळ घालवतो. मात्र तो वेळ माझ्यासाठी खूप किमती आहे.

‘त्याच्यापासून एक डान्स स्टुडंट प्रेग्नन्ट होती’ एक्स बॉयफ्रेंडवर भडकली सना खान

सुरेश रैना लवकरच IPLमध्ये खेळणार आहे. मागच्या वर्षी IPL नंतर गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रैनानं कोणतीही मॅच खेळलेली नाही. ऑगस्टमध्ये रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून आता तो आता पूर्णपणे ठिक झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यानं IPL-2020 चांगलं प्रदर्शन करुन भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं.

ज्याला करायचं होतं डेट, त्याची झाली भेट! रिंकू राजगुरूनं शेअर केला PHOTO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 05:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading