मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'राहुल द्रविडच्या संतापामुळे कपडे फेकून द्यावे लागले', सुरेश रैनाचा खुलासा

'राहुल द्रविडच्या संतापामुळे कपडे फेकून द्यावे लागले', सुरेश रैनाचा खुलासा

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो चिडल्याचं खूप कमी लोकांनी पाहिलं आहे.  सुरेश रैनाला (Suresh Raina) एकदा द्रविडच्या रागाचा सामना करावा लागला होता.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो चिडल्याचं खूप कमी लोकांनी पाहिलं आहे. सुरेश रैनाला (Suresh Raina) एकदा द्रविडच्या रागाचा सामना करावा लागला होता.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो चिडल्याचं खूप कमी लोकांनी पाहिलं आहे. सुरेश रैनाला (Suresh Raina) एकदा द्रविडच्या रागाचा सामना करावा लागला होता.

मुंबई, 14 जून : टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो चिडल्याचं खूप कमी लोकांनी पाहिलं आहे. मलेशियामध्ये 2006 साली झालेल्या दौऱ्याच्या वेळी द्रविडच्या रागाचा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) सामना करावा लागला. सुरेश रैनानं (Suresh Raina)  त्याचं आत्मचरित्र 'बिलिव्ह, व्हॉट लाईफ ऍण्ड क्रिकेट टॉट मी,' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

का संतापला द्रविड?

राहुल द्रविडनं सुरेश रैनाच्या कपड्यावर लिहलेल्या एका शब्दावर प्रश्न उपस्थित केला होता, असं रैनानं या पुस्तकात लिहले आहे.  रैनाच्या टी शर्टवर Fuck हा शब्द होता. त्यावर द्रविड नाराज झाला. ' तू हे काय घालून फिरत आहेस? तू एक भारतीय क्रिकेटपटू आहेस. तुझ्या टी शर्टवर जे लिहलं आहे ते सार्वजनिक करु शकत नाहीस,' असं द्रविडनं सांगितलं. द्रविडच्या संतापामुळे रैना इतका घाबरला की त्याने तातडीने कपडे बदलले आणि तो टी शर्ट कचरापेटीत टाकून दिला. रैनाने द्रविडच्याच कॅप्टनसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मलेशियात 2006 साली ट्राय सीरिज होती. यामध्ये भारताशिवाय ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन टीम सहभागी झाल्या होत्या.

सुरेश रैनानं सांगितलं की, 'सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन करावे याबाबत राहुल द्रविड नेहमी दक्ष असे. भारताकडून खेळणे हा त्याच्यासाठी मोठा सन्मान होता. क्रिकेटपटू हे देशाचे प्रतिनिधी असतात, असे त्याचे मत होते. त्यामुळे तुम्ही कोणते कपडे घालता, कसे वागता याला मोठं महत्त्व असल्याचं द्रविडचं मत होतं.'

मैदानात कसा होता द्रविड?

'राहुल द्रविड हा मैदानात नेहमी गंभीर असे. त्याने आराम करण्यासाठी कधीतरी हसावं असं मला वाटत असे. मात्र खेळण्याची तयारी करण्याची त्याची ती पद्धत होती. त्याला कुणीही त्रास देऊ शकत नव्हतं.' असं रैनानं सांगितलं.

इंग्लंडविरुद्ध जिंकल्यानंतरही न्यूझीलंडची डोकेदुखी कायम, फायनलपूर्वी 'हा' संभ्रम

राहुल द्रविड निवृत्तीनंतर देखील भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. क्रिकेटपटूंची तरुण पिढी घडवण्याचं श्रेय त्याला दिले जाते. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टीमचा तो हेड कोच आहे. या दौऱ्यात अनेक तरुण खेळाडू आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या या मालिकेत टीम इंडिया 3 वन-डे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rahul dravid, Suresh raina