मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, IPL सोडून सुरेश रैना भारतात परतला

मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, IPL सोडून सुरेश रैना भारतात परतला

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केई विश्वनाथन यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : चैन्नई सुपर किंग्स समोरील आव्हान काही संपताना दिसत नाहीत. IPLमधून CSKचा स्टार खेळाडू मायदेशी परतला आहे. चैन्नई सुपरकिंगचा फलंदाज सुरेश रैना कौटुंबि कारणामुळे भारतात परतला आहे. संपूर्ण IPL रैना खेळणार नसल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केई विश्वनाथन यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. टीमकडू रैनाच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य मिळेल असंही त्यांनी सांगितलं.

'सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव भारतात परतला आहे. संपूर्ण हंगामासाठी तो संघाबाहेर असेल. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज सुरेश आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य करेल', असं CSKच्या सीईओने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा-'या' 5 फलंदाजांनी गाजवल्या IPL फायनल! सर्वाधिक स्ट्राइक रेटचा विक्रम नावावर

महेंद्रसिंग धोनीनंतर नुकतीच सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. IPLमध्ये CSKकडून खेळण्यासाठी रैना सज्ज झाला होता मात्र काही कारणास्तव सामना खेळण्याआधीच सगळं सोडून पुन्हा भारतात यावं लागलं आहे. यावेळी CSK टीम रैनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचंही सांगितलं जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 29, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या