• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'ग्रेग चॅपल चूक नव्हते, पण सीनिअर खेळाडू...' सुरेश रैनानं उलगडलं 'ते' रहस्य

'ग्रेग चॅपल चूक नव्हते, पण सीनिअर खेळाडू...' सुरेश रैनानं उलगडलं 'ते' रहस्य

सुरेश रैनानं (Suresh Raina) त्याचं आत्मचरित्र 'बिलिव्ह, व्हॉट लाईफ ऍण्ड क्रिकेट टॉट मी,' या पुस्तकात माजी कोच ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांच्याबाबत काही खुलासे केले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 14 जून: टीम इंडियाचा माजी बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina)  त्याचं आत्मचरित्र 'बिलिव्ह, व्हॉट लाईफ ऍण्ड क्रिकेट टॉट मी,' या पुस्तकात माजी कोच ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांच्याबाबत काही खुलासे केले आहेत. चॅपल हेड कोच होते तेव्हाच सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी तो टीमचा महत्त्वाचा खेळाडू होता. चॅपल 2005 साली  भारतीय टीमचं प्रशिक्षक बनले. त्यांची कारकिर्द फार वादग्रस्त राहिली. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे आणि कर्णधार सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) बरेच वाद झाले. अखेर सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पाय उतार व्हावं लागलं. 2007 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम पहिल्याच राऊंडला बाहेर पडल्यानंतर सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) सीनिअर खेळाडूंशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. सुरेश रैनानं त्याच्या पुस्तकात लिहलं आहे की, 'चॅपल यांना नेहमी रिझल्ट हवा असे. तो प्राप्त करण्यासाठी काय करावं याची योजना ते करत. मी माझे करियर सुरु केल्यानंतर त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यानं खूश होतो. चॅपल कधीही चूक नव्हते. कारण टीम इंडियाला मजबूत बनवणे हा त्यांचा उद्देश होता. मात्र सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर या सीनिअर खेळाडूंना त्यांनी अधिक चांगली वागणूक द्यायला हवी होती.' रैना पुढे लिहितो, 'टीममधील सीनिअर खेळाडू खूप वेगळे होते. त्यांचे  कदाचित चॅपलबरोबर तसे समीकरण होते. चॅपल यांनी सीनिअर खेळाडूंना वेगळी वागणूक द्यायला हवी होती. त्यांनी कधीही एका खेळाडूची बाजू घेतली नाही. पण त्यांनी सचिन आणि दादाचा अधिक सन्मान करायला हवा होता,असे मी मानतो.' इंग्लंडमध्ये दिसला 'सर जडेजा शो', न्यूझीलंडला धोक्याचा इशारा, VIDEO वर्ल्ड कप जिंकण्याचे श्रेय टीम इंडियानं 2011 साली वर्ल्ड कप जिंकला. रैनानं या विजेतेपदाचे श्रेय चॅपल यांना दिले आहे. ग्रेग चॅपल यांना भारतीय खेळाडूंची एक पिढी तयार करण्याचं श्रेय मिळायला पाहिजे. त्यांनी जे बी रोवले, त्याची फळं नंतर मिळाली, जेव्हा आपण 2011 वर्ल्ड कप जिंकलो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेच वाद झाले, पण त्यांनी टीमला जिंकवणं आणि जिंकवण्याचं महत्त्व सांगितलं,' असं रैनानं त्याच्या पुस्तकात स्पष्ट केले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: