गावस्कर म्हणातात, निवड समितीला 'या' प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल?

गावस्कर म्हणातात, निवड समितीला 'या' प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल?

वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीवरून अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या निवड समितीवर माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी सातत्यानं टीका केली आहे. सुरुवातीला त्यांनी विराटच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. विराटकडे नेतृत्व दिलंच कसं असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यानंतर निवड समितीच्या कार्यशैलीवरही सुनिल गावस्कर यांनी टीका केली होती.

वर्ल्ड कपनंतर आता भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर आहे. संघातील खेळाडू वर्ल्ड कपमधील पराभव मागे टाकून दौऱ्यासाठी तयार झाले आहेत. तरीही वर्ल्ड कपमधील कामगिरी, निवड समितीचे निर्णय यावर अनेकजण प्रश्न विचारत आहेत. भारताने सेमीफायनलमध्ये धोनी, कार्तिक, पंत आणि केएल राहुल असे चार यष्टीरक्षक संघात खेळवले होते. संघाकडे प्रतिभावान खेळाडू असतानाही महत्त्वाच्या सामन्यात अशी संघनिवड कशी केली? यावर आज नाही तर उद्या संघ व्यवस्थापनाला उत्तर द्यावंच लागेल असं गावस्कर म्हणाले. एका मुलाखतीत त्यांनी भारताने सेमीफायनलमध्ये निवडलेल्या संघाबद्दल प्रश्न विचारले.

भारताच्या आघाडीच्या फळीतील 3 फलंदाज वगळता इतर फक्त औपचारिकता म्हणून उरले होते. त्यात खात्रीने संघाला तारून नेईल असा खेळाडू नव्हता. रोहित, विराट आणि लोकेश राहुल यांच्यावरच फलंदाजीची भिस्त होती असं गावस्कर म्हणाले. वर्ल्ड कपमध्ये पंतच्या ऐवजी कार्तिकला संधी देताना निवड समितीने धोनी महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही तर कार्तिकचा अनुभव उपयोगी पडेल असं म्हटलं होतं. मात्र, काही सामन्यात दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळले होते.

गावस्कर यांनी विंडीज दौरा सुरू होण्यापूर्वीसुद्धा संघ व्यवस्थापनावर हल्लाबोल केला होता. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर विराटकडेच कर्णधार पद ठेवण्यावरून त्यांनी निवड समितीला डिवचलं होतं. गावस्कर यांनी म्हटलं होतं की, विराटला पुन्हा कर्णधार करण्यापूर्वी निवड समितीने बैठक घ्यायला पाहिजे होती. त्यांनी हा निर्णय कसा घेतला? असेही प्रश्न विचारले होते.

'कांबळ्या...', Friendship Dayआधी जुन्या आठवणींना सचिन झाला भावुक!

India vs West Indies 1st T20 Live Score : भारत-वेस्ट इंडिज आज भिडणार, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

वाचा- 5 वर्षांनंतर भारताकडे अशी असेल फलंदाजांची फौज!

MumbaiRains : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाचा भाग कोसळला, लोकल सेवेवर मोठा परिणाम

First published: August 3, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading