मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'टीम इंडिया इंग्लंडचा 4-0 ने पराभव करेल', दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

'टीम इंडिया इंग्लंडचा 4-0 ने पराभव करेल', दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

टीम इंडिया (Team India) 6 टेस्ट मॅच खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या मालिकेची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनं (WTC Final 2021) होणार आहे.

टीम इंडिया (Team India) 6 टेस्ट मॅच खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या मालिकेची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनं (WTC Final 2021) होणार आहे.

टीम इंडिया (Team India) 6 टेस्ट मॅच खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या मालिकेची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनं (WTC Final 2021) होणार आहे.

मुंबई, 4 जून: टीम इंडिया (Team India) 6 टेस्ट मॅच खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या मालिकेची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनं (WTC Final 2021) होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान ही फायनल होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

'भारतीय क्रिकेट टीम यजमान इंग्लंडचा 4-0 ने पराभव करेल,' असा दावा टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केला आहे. 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. "वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर सहा आठवड्यांनी भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज सुरु होणार आहे. त्यामुळे फायनल मॅचच्या रिझल्टचा कोणताही परिणाम या सीरिजवर होणार नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणारी ही सीरिज टीम इंडिया 4-0 ने जिंकेल,'' असे भविष्य गावसकर यांनी यावेळी व्यक्त केले.

इंग्लंडची खास योजना

इंग्लंडच्या टीमनं या वर्षी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी भारतामधील स्पिन पिचवर त्यांनी नाराजी केली होती. आता इंग्लंड दौऱ्यात यजमान टीम फास्ट पिच तयार करुण भारतीय बॅट्समनचं स्वागत करेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विराट कोहलीच्या टीममध्येही चांगले फास्ट बॉलर्स असल्यानं याचा टीम इंडियाला फटका बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टीम इंडिया बुधवारी  इंग्लंडमध्ये दाखल झाली. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर कोणताही खेळाडू हॉटेलच्या बाहेर पडू शकणार नाही. तसंच त्यांची रोज टेस्ट होणार आहे, तिन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 6 जूनपासून खेळाडूंचे छोटे-छोटे ग्रुप ट्रेनिंगला सुरुवात करतील. 12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे.

WTC Final 2021: टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल, खेळाडूंनी शेअर केले साऊथम्पटन मैदानाचे PHOTOS

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून या कालावधीमध्ये होणार आहे, तर 23 जून हा रिझर्व डे असणार आहे. पाच दिवसांचा खेळ पूर्ण झाल्यानंतरही जर ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत, तर मॅच रेफ्री याचा निर्णय घेतील. जर मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल झाल्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england, Sunil gavaskar, Team india