IPL 2020 : रोहितच्या दुखापतीचा वाद, गावसकर यांनी BCCI कडे केली ही मागणी

IPL 2020 : रोहितच्या दुखापतीचा वाद, गावसकर यांनी BCCI कडे केली ही मागणी

आयपीएल (IPL 2020) दरम्यान मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma)याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, त्यामुळे वाद निर्माण झाला. पण या सगळ्या वादावर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

दुबई, 4 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) दरम्यान मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma)याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, पण रोहित नेटमध्ये सराव करताना दिसल्यामुळे वाद निर्माण झाला. एवढच नाही तर मंगळवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित मैदानात उतरला. टॉसवेळी रोहितने आपण फिट असल्याचं सांगितलं, त्यामुळे आणखी प्रश्न उपस्थित होऊ लागले. पण या सगळ्या वादावर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'स्पोर्ट्स तक' या युट्यूब चॅनलशी बोलताना गावसकर म्हणाले, 'रोहितच्या दुखापतीवरुन पहिले जे झालं ते विसरून गेलं पाहिजे. त्याचं फिट होणं भारतीय क्रिकेटसाठी खूशखबर आहे. तसंच रोहितने पुनरागमनाची घाई करु नये, ही रवी शास्त्री आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा सल्लाही योग्य होता,' असं गावसकर म्हणाले.

'रोहितने पुनरागमनाची घाई केली, तर त्याची दुखापत वाढू शकते याची सगळ्यांना चिंता होती, पण रोहित आत्मविश्वासाने मैदानात उतरला, त्याने 30 यार्डमध्ये फिल्डिंगही केली. बीसीसीआयला जर रोहितची पुन्हा फिटनेस टेस्ट घ्यायची असेल, तर त्यात काहीच गैर नाही. मॅच खेळून त्याने आपण फिट असल्याचं दाखवलं,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.

रोहितचं टीममध्ये पुनरागमन झालं, तर त्याला उपकर्णधारपद पुन्हा मिळेल का नाही, या वादात मला पडायचं नाही. प्रमुख मुद्दा खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध आहे का नाही? हा आहे. त्याने मॅचआधी दोन वेळा मी फिट असल्याचं सांगितलं. उद्याचं बोलण्याऐवजी आजचं बोललं गेलं पाहिजे आणि आज तो फिट आहे, असं विधान गावसकर यांनी केलं.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 11:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या