दुबई, 14 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) टेस्ट क्रिकेटमधील 10 दिग्गजांचा प्रतिष्ठेच्या ‘हॉल ऑफ फेम’ (Hall of Fame) मध्ये समावेश केला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final) आयसीसीने ही घोषणा केली आहे.
‘हॉल ऑफ फेम’ च्या नव्या यादीमध्ये पाच काळातील प्रत्येकी दोन क्रिकेपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताच्या विनू मंकड (Vinoo Mankad) यांचा समावेश आहे. भारताच्या महान ऑल राऊंडरमध्ये मंकड यांचा समावेश होतो. त्यांनी 44 टेस्टमध्ये 31.47 च्या सरासरीने 2,109 रन काढले. त्याचबरोबर 32.62 च्या सरासरीने 162 विकेट्स घेतल्या.
लॉर्ड्समध्ये केली होती कमाल
लॉर्ड्सवर 1952 साली झालेली टेस्ट मॅच मंकड यांनी गाजवली. इंग्लंड विरुद्ध झालेल्या त्या टेस्टमध्ये त्यांनी 72 आणि 184 रन काढले त्याचबरोबर 97 ओव्हर्स बॉलिंग देखील केली. टेस्ट करियरमध्ये सर्व नंबरवर बॅटींग करणाऱ्या तीन बॅट्समनमध्ये त्यांचा समावेश होता. महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचे ते प्रशिक्षक होते.
"The finest Indian left-arm spinner ever."
The great Vinoo Mankad is inducted into the #ICCHallOfFame 2021 👏 pic.twitter.com/djFdwu8GS9 — ICC (@ICC) June 13, 2021
गावसकरांनी व्यक्त केला आनंद
सुनील गावसकरांनी मंकड यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “भारताकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास हवा, असं मकंड सांगत असत.” असे गावसकर यावेळी म्हणाले.
विनू मंकडसह वेस्ट इंडिजचे डेसमंड हेन्स, इंग्लंडचे बॉब विलिस, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉलवरचा ‘वॉल ऑफ फेम’ च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
40 ओव्हर्समध्ये फक्त 45 रनवर ऑल ऑऊट! टेस्टमध्ये नाही तर वन-डेमध्ये झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये क्रिकेटपटूंची निवड व्होटिंग अकादमीच्या माध्यमातून होते. यामध्ये ‘हॉल ऑफ फेम’चे सक्रीय सदस्य, एफएसआयचा एक प्रतिनिधी, प्रमुख क्रिकेट पत्रकार आणि आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी पाच काळातील क्रिकेटपटूंची निवड ऑनलाईन मतदानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Icc, Sunil gavaskar