नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी दिल्लीमधील फिरोज शहा कोटला स्टेडियममध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मॅचमध्ये बॉल लागलेल्या अंपायरचं निधन झालं आहे. सुमीत बन्सल (Sumit Bansal) असं त्यांचं नाव असून ते 46 वर्षांचे होते.
बीसीसीआयचे मान्यताप्राप्त अंपायर असलेले सुमीत हे माजी आंतरराष्ट्रीय अंपायर एस.के. बन्सल यांचे पुत्र होते. 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये त्यांच्या चेहऱ्याला जोरात बॉल लागला होता. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांचे Cardiac arrest नं निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.
Sumit Bansal, BCCI umpire, and son of former International Umpire SK Bansal, passed away this morning due to cardiac arrest. He was 46. He stood in a match at Kotla on Oct 2 and was hit badly on the face when the ball was deflected by the bowler. Om Shanti 🕉
— Vijay Lokapally (@vijaylokapally) October 10, 2021
सुमीत बन्सल यांच्या निधनानंतर क्रिकेट मैदानातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा (Ramn Lamba) याचा बांगालादेशमध्ये क्रिकेट खेळताना बॉल लागल्यानं 1998 साली मृत्यू झाला होता. तसंच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेस (Phillip Hughes) या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचही काही वर्षांपूर्वी बॉल लागल्यानं निधन झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news