मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी,टीम पेन कर्णधारपदी

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी,टीम पेन कर्णधारपदी

केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा स्टीव्ह स्मिथनं  राजीनामा दिलाय. त्याच्या बरोबर उपकर्णधार डेव्हिड वाॅर्नरही पायउतार झालाय.

25 मार्च : केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा स्टीव्ह स्मिथनं  राजीनामा दिलाय. त्याच्या बरोबर उपकर्णधार डेव्हिड वाॅर्नरही पायउतार झालाय. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदी टीम पेनची निवड झालीय. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या कसोटीत चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रिलियन क्रिकेटमध्ये मोठं वादळ आलं. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले. काय आहे प्रकरण ? केप टाऊन इथे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनीतीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा  डागाळली आहे.
First published:

Tags: Cricket, Steve smith, Tim paine, आॅस्ट्रेलिया, डेव्हिड वाॅर्नर, स्टीव्ह स्मिथ

पुढील बातम्या