आर्चरचा चेंडू लागून स्मिथ मैदानावरच कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

आर्चरचा चेंडू लागून स्मिथ मैदानावरच कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतक करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडनं आर्चरला संघात घेतलं.

  • Share this:

लंडन, 18 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतक करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणाऱ्या स्टीव्ह स्मिथचं इंग्लंडसमोर मोठं आव्हान आहे. दुसऱ्या कसोटीत स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडनं जोफ्रा आर्चरला संघात घेतलं. जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यानं स्मिथ बाद झाला नाही पण जखमी होऊन त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. स्टिव्ह स्मिथ 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा उसळता चेंडू थेट स्मिथच्या मानेवर आदळला. त्यावेळी स्मिथ मैदानावर कोसळताच सर्व खेळाडूंसह प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्मिथ वर्ल्ड कपपासून फॉर्ममध्ये आहे. त्यानं पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात स्मिथला लवकर बाद करण्यासाठी इंग्लंडनं आर्चरला संघात घेतलं. तरीही स्मिथ मैदानावर टिकून होता. स्मिथच्या 70 धावा झाल्या असताना आर्चरचा एक चेंडू दंडावर आदळला होता. त्यानंतर 80 धावांवर खेळत असताना वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा स्मिथ मैदानावर कोसळला. त्यावेळी स्मिथ हेल्मेट काढून तसाच पडून राहिला. डॉक्टरांच्या टीमने मैदानात त्याची तपासणी केली आणि अखेर त्याला मैदान सोडावं लागलं.

आर्चरचा चेंडू लागून स्मिथ मैदानावर कोसळला तेव्हा सर्वांना फिल ह्यूजेसची आठवण झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर स्मिथनं मैदान सोडलं. तेव्हा प्रेक्षकांनी स्मिथला उभा राहून अभिवादन केलं. स्मिथ मैदानाबाहेर गेला मात्र, सिडल बाद झाल्यानंतर तो पुन्हा परतला. 80 धावांमध्ये 12 धावांची भर घालून तो बाद झाला. वोक्सनं त्याला पायचित केलं. 161 चेंडूत 14 चौकारांच्या सहाय्यानं 92 धावा केल्या. त्याचं सलग तिसरं शतक हुकलं.

'माय नेम इज यश खान', मुस्लीम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या