वर्ल्ड कप आधी ‘या’ संघाचा कर्णधार जेलमध्ये

श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला कोलंबो पोलिसांनी अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 01:12 PM IST

वर्ल्ड कप आधी ‘या’ संघाचा कर्णधार जेलमध्ये

श्रीलंका, 1 एप्रिल : साऊथ आफ्रिकेला त्यांच्याच घरात हरवून श्रीलंकेच्या कसोटी संघानं इतिहास रचला. मात्र, आता इंग्डंलमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी श्रीलंकेच्या संघावर घात झाला आहे. एकीकडं सगळे देश विश्वचषकासाठी संघबांधणी करत असताना, या संघाचा कर्णधारच कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे.

श्रीलंकेच्या कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारा या संघाचा कसोटी कर्णधार दिमुख करुणारत्ने याला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं केले अपराध वाचून तुम्हचा क्रिकेटपटूंवरचा विश्वास उडेल. करुणारत्नेवर मद्य प्राशन करुन गाडी चालवल्याचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी करुणारत्नेला अटक करताच काही तासांत जामिनावर सोडले. दरम्यान करुणारत्नेविरोधात सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिडीया रिपोर्टनुसार, करुणारत्ने नशेत गाडी चालवत होता आणि नशेतच त्यानं एका रिक्षाचालकाला उडवले. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्या, या आठवड्यतात करुणारत्ने याची कोर्टात सुनावणी होऊ शकते. श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या कारवाईनुसार करुणारत्नेवर बॅनही लागू शकते. सध्या करुणारत्नेवर सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान काही दिवसांत त्याच्यावर काय कारवाई केली जाणार ही जाहीर करण्यात येणार आहे.Loading...

सध्या श्रीलंकेचे खेळाडू श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या विविध नियमांमुळं त्रस्त आहेत. त्यात आता करुणारत्नेच्या या बातमीमुळं क्रिकेट बोर्ड आपले नियम आणखी कडक करणार आहे.


VIDEO: 'इस्रो'ने पुन्हा रचला इतिहास, एमिसॅट्सह 28 उपग्रहांनी अशी घेतली भरारी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...