महेंद्रसिंह धोनीचा जुना सहकारी 32 व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्त

महेंद्रसिंह धोनीचा जुना सहकारी 32 व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्त

श्रीलंकेचा ऑलराऊंडर थिसारा परेरा (Thisara Perera) यानं वयाच्या 32 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. परेरानं 2009 साली भारताविरुद्ध पदार्पण केले होते.

  • Share this:

मुंबई, 3 मे : श्रीलंकेचा ऑलराऊंडर थिसारा परेरा (Thisara Perera) यानं वयाच्या 32 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. परेरानं 2009 साली भारताविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. परेरानं 6 टेस्ट, 166 वन-डे आणि 84 टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं.

परेरानं मार्च महिन्यामध्ये श्रीलंकेतील स्थानिक क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले होते. ही कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पहिला खेळाडू आहे. श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा परेरा हा पहिलाच बॉलर आहे. त्यानं भारताविरुद्ध हा विक्रम केला होता. त्याचबरोबर एकही अर्धशतक न झळकावता श्रीलंकेकडून सर्वात जास्त टी20 मॅच खेळण्याचा आणि सर्वाधिक रन करण्याचा विक्रमही परेराच्या नावावर आहे.

परेरा आयपीएलचे 7 सिझन खेळला आहे. यामध्ये तो चेन्नई सुपर किंग्स, कोची टस्कर्स, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या टीमचा सदस्य होता. यापैकी चेन्नई आणि पुण्याच्या टीममध्ये तो महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) मुख्य सहकारी होता.

IPL 2021: आयपीएलला कोरोनाचा फटका, KKR नंतर CSK चे 3 सदस्य पॉझिटीव्ह

परेरानं टेस्ट, वन-डे आणि टी-20 मध्ये अनुक्रमे 203, 2338 आणि 1204 रन केले. तर टेस्टमध्ये 11, वन-डे मध्ये 175 आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंका टीमचा कॅप्टन म्हणूनही त्यानं काही काळ जबाबदारी सांभाळली आहे. परेरानं न्यूझीलंड विरुद्ध वन-डेमध्ये  एकमेव शतक झळकावलं.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 4:39 PM IST

ताज्या बातम्या