• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • श्रीलंका क्रिकेटमध्ये बंड! भारत दौऱ्यापूर्वी खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी

श्रीलंका क्रिकेटमध्ये बंड! भारत दौऱ्यापूर्वी खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी

टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट टीममधील (Sri Lanka Cricket Team) खेळाडूंनी बोर्डाच्या विरुद्ध बंड पुकारलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 मे : टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट टीममधील (Sri Lanka Cricket Team) खेळाडूंनी  बोर्डाच्या विरुद्ध बंड पुकारलं आहे. नाराज खेळाडूंनी निवृत्ती घेण्याची धमकी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. श्रीलंका बोर्डाच्या नव्या वेतन पद्धतीवर खेळाडू नाराज आहेत. या पद्धतीनुसार अनुभवी खेळाडूंच्या पगारात मोठी कपात होणार आहे. काय आहे पद्धत? श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नव्या वेतन पद्धतीनुसार खेळाडूंची विभागणी चार गटांमध्ये होणार आहे. यामधील प्रत्येक खेळाडूंना पॉईंट्स दिले जातील. त्या पॉईंट्सनुसार त्यांचा पगार निश्चित होणार आहे.  फिटनेस,  शिस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी आणि नेतृत्त्व क्षमता या आाधारावर खेळाडूंना पॉईंट्स दिले जाणार आहेत. खेळाडू नाराज का? श्रीलंका बोर्डानं जाहीर केलेल्या पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. नव्या पद्धतीमध्ये त्यांच्या पगारात मोठी कपात होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे ही नवी पद्धत लागू करुन खेळाडूंचा पगार कमी करण्याचा निर्णय बोर्डानं घेतला आहे. हे पॉईंट्स कशा पद्धतीनं दिले जातील ते बोर्डानं जाहीर करावं. त्यानुसार आम्हाला तयारी करता येईल असं खेळाडूंचं मत आहे. या खेळाडूंना ही प्रक्रिया जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं त्यांच्या प्रतिनिधीनं 'संडे टाईम्स' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. भारतीय क्रिकेटपेक्षा शेती बरी! माजी कोचचा दावा, खेळाडू आणि प्रशासनावर केला आरोप श्रीलंका क्रिकेट अडचणीत श्रीलंका क्रिकेट टीम गेल्या काही वर्षांपासून अडचणीत सापडली आहे. गेल्या पाच वर्षात श्रीलंकेच्या वन-डे टीमचा कॅप्टन 9 वेळा बदलण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं कुशल परेरावर सध्या ही जबाबदारी सोपवली आहे. बांगलादेश दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीममध्ये दिनेश चंदिमल आणि अँजलो मॅथ्यूज यांना जागा मिळालेली नाही. तर, दिमूख करुणारत्ने याची कॅप्टनपदाबरोबरच टीममधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. 23 मे पासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे.  तर भारत आणि श्रीलंकेतील वन-डे सीरिज 13 जुलैपासून सुरु होईल.
  Published by:News18 Desk
  First published: