मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

श्रीलंका क्रिकेटमधील वादावर अखेर तोडगा, 13 हजार रन करणाऱ्या खेळाडूला वगळले

श्रीलंका क्रिकेटमधील वादावर अखेर तोडगा, 13 हजार रन करणाऱ्या खेळाडूला वगळले

 श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) आणि खेळाडूंमध्ये  गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. मात्र यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त रन करणाऱ्या खेळाडूला वगळण्यात आले आहे.

    मुंबई, 21 ऑगस्ट : श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) आणि खेळाडूंमध्ये  गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. श्रीलंकेच्या 18 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डाच्या अटींना मान्यता दिली असून त्यांच्याशी आता पाच महिन्यांचा करार करण्यात आला आहे. 2021 च्या अखेर हा करार संपुष्टात येईल. श्रीलंकेतील सर्वात बड्या क्रिकेटपटूची समजूत घालण्यास बोर्डाला अजूनही यश आलेलं नाही. त्यामुळे त्याला या करारातून वगळण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार 18 खेळाडूंनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार पाच महिन्यांचा असून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी या कराराची मुदत संपेल. धनुष्क गुणतिलक, निराशेन डिकवेला आणि कुशल मेंडीस या तिघांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा या करारात समावेश करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी कॅप्टन एंजलो मॅथ्यूजनंही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार पेक्षा जास्त रन करणारा मॅथ्यूज सध्या निवडीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा या खेळाडूंच्या गटात समावेश करण्यात आलेला नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. एंजलो मॅथ्यूज हा सध्या श्रीलंकेचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्यानं 90 टेस्टमध्ये 45 च्या सरासरीनं 6236 रन काढले असून यामध्ये 11 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 33 विकेट्सही घेतल्या आहेत. मॅथ्यूजनं 218 वन-डेमध्ये 42च्या सरासरीनं 5285 रन काढले आहेत. यामध्ये 3 शतक , 40 अर्धशतक आणि 120 विकेट्सचा समावेश आहे. तर त्यानं  78 आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 1148 रन काढले असन 38 विकेट्स घेतल्या आहेत. आगामी टी 20 वर्ल्ड कपपूर्वी मॅथ्यूजशी असलेला वाद मिटवण्यात श्रीलंकेच्या बोर्डाला अपयश आलं आहे. हा टीमसाठी मोठा धक्का मानला जातोय. 'टीम इंडियाच्या क्रिकेटपटूला फाशीसाठी लांब दोरखंड द्या', अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेनं खळबळ या खेळाडूंशी करार: धनंजया डी सिल्वा, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, सुरंगा लकमल, दसुन शनाका, वानिंदू हसारंगा, लसिथ एम्बुलडेनिया, पथुम निसंका, लाहिरु थिरिमाने, दुसमंथा चमीरा, दिनेश चांदीमल, लक्षण संदाकन, विश्वा फर्नांडो, ओशादा फर्नांडो, रमेश मेंडिस, लाहिरू कुमारा, अशेन बंडारा, और अकिला धनंजय.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या