Home /News /sport /

ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची होती तयारी तो अखेर निवृत्त

ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची होती तयारी तो अखेर निवृत्त

मागील वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2020 Auction) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमनं एका फास्ट बॉलरसाठी तब्बल 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी केली होती.

    मुंबई, 31 जुलै : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत अनेकदा एखाद्या खेळाडूचं नशीब बदलतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी कमाल न करणाऱ्या खेळाडूंना देखील खरेदी करण्यासाठी आयपीएल टीम त्यांची संपूर्ण पर्स रिकामी करतात. मागील वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2020 Auction) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमनं एका फास्ट बॉलरसाठी तब्बल 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी केली होती. त्या फास्ट बॉलरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीलंकेचा फास्ट बॉलर  इसुरु उदानानं (Isuru Udana) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. उदाना भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळला होता. नव्या क्रिकेटपटूंना संधी मिळावी म्हणून आपण निवृत्त होत असल्याचं उदानानं जाहीर केलं आहे. 2009 साली पदार्पण उदानानं 2009 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये उदाना फायनलसह पाच सामने खेळला. त्यानं 2012 साली भारताविरुद्ध  वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी दोन वन-डे खेळल्यानंतर तो जवळपास सात वर्ष श्रीलंका टीमच्या बाहेर होता. मागील दोन वर्षांमध्ये तो श्रीलंकेच्या टीमचा नियमित सदस्य झाला होता. मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तो स्पेशालिस्ट समजला जातो. त्याचबरोबर लोअर ऑर्डरमध्ये त्याची बॅटींग देखील उपयुक्त होती. त्याने एकूण 21 वन-डे आणि 33 टी 20 सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं. जगभरातील टी 20 लीगमध्ये खेळण्याचाही त्याला अनुभव आहे. 28 कोटींची होती तयारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मागच्या वर्षी श्रीलंकेचा फास्ट बॉलर इसरु इसुरु उदानाला (Isuru Udana) 50 लाखांना घेतले होते. मात्र त्याला खरेदी करण्यासाठी बंगळुरुची त्यांच्याकडील सर्व 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी होती. बंगळुरुचे क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन यांनी मागच्या वर्षी झालेल्या लिलावानंतर याचा गौप्यस्फोट केला होता. IND vs SL : ऐतिहासिक विजयानंतर श्रीलंका बोर्ड खूश, क्रिकेटपटू होणार मालामाल बंगळुरुनं मोठ्या अपेक्षेनं घेतलेल्या उदानाची मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमधील कामगिरी साधारण होती. त्यानं 10 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या. तसंच त्याचा इकॉनॉमी रेटही 9 पेक्षा जास्त होता. त्यामुळे या सिझनपूर्वी बंगळुरुनं त्याला रिलीज केले होते. या लिलावात उदाना पुन्हा एकदा सहभागी झाला होता. मात्र त्याला एकाही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, RCB, Sri lanka, Virat kohli

    पुढील बातम्या