मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: SRH जिंकताच 'मिस्ट्री गर्ल'ची कळी खुलली, हसऱ्या चेहऱ्यावर Social Media फिदा

IPL 2021: SRH जिंकताच 'मिस्ट्री गर्ल'ची कळी खुलली, हसऱ्या चेहऱ्यावर Social Media फिदा

 हैदराबादनं विजय मिळवताच सोशल मीडियावर 'मिस्ट्री गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या काव्या मारन (Kaviya Maran) हीचा चेहरा चांगलाच खुलला. आनंदी मुडमधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहेत.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 21 एप्रिल:  सनरायझर्स हैदराबादनं (SRH) आयपीएल स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. चेन्नईत झालेल्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा (PBKS) 9 विकेट्सनं पराभव केला. हैदराबादचा हा या स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. सलग तीन पराभवानंतर हैदराबादनं अखेर विजयाची चव चाखली आहे. हैदराबादनं विजय मिळवताच सोशल मीडियावर 'मिस्ट्री गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या  काव्या मारन (Kaviya Maran) यांचा चेहरा चांगलाच खुलला. आनंदी मुडमधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहेत.

पंजाबनं दिलेलं 121 रनचं आव्हान हैदराबादनं आरामात पार केलं. हैदराबादचा खराब बॅटिंगमुळे मागील तीन सामन्यात पराभव झाला होता. पंजाब किंग्ज विरुद्ध त्यांनी ती चूक केली नाही. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 73 रनची भक्कम पार्टरनरशिप केली. वॉर्नर 37 रनवर आऊट झाला. त्यानंतर बेअरस्टोला या आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या अनुभवी केन विल्यमसननं (Kane Williamson) भक्कम साथ दिली. या दोघांनी चांगल्या ओपनिंग पार्टरनरशिपचा बेरंग होणार नाही, याची काळजी घेतली. बेअरस्टोनं 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. त्यानं नाबाद 63 रन काढले.

हैदराबादच्या प्रत्येक सामन्यात काव्या मारनच्या प्रतिक्रियेकडं सर्वांचं लक्ष असतं. मागील तीन मॅचमध्ये कोमजलेला तिचा चेहरा चांगलाच चर्चेत होता. बुधवारच्या मॅचमध्येही कॅमेरा तिच्याचवर फोकस होता. डेव्हिड वॉर्नरच्या टीमनं सामना जिंकताच तिचा हसरा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यापूर्वी  पंजाबचा कॅप्टन के.एल. राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या बॅट्समन्सना या निर्णयाचा फायदा घेता आला नाही. पंजाबकडून . मयंक अग्रवालनं सर्वात जास्त 22 रन काढले. हाैदराबादकडून खलिल अहमदनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्मानं 2 तर राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

First published:

Tags: IPL 2021, Photo viral, Punjab kings, SRH