चेन्नई, 18 एप्रिल : माजी आयपीएल चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) या सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी सुरु आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये त्यांना मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 13 रननं पराभूत केलं. या पराभवानंतर हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) निराश झाला आहे. त्याचबरोबर केन विल्यमसनचा (Kane Williamson) अंतिम 11 मध्ये समावेश कधी होणार? या सध्या चर्चेत असलेल्या प्रश्नाचंही त्यानं उत्तर दिलं आहे.
बांगलादेश विरुद्ध झालेल्या मालिकेच्या दरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. त्यानंतर तो आजवर एकही मॅच खेळलेला नाही. विल्यमसनच्या फिटनेसबाबत टीमच्या फिजिओशी चर्चा करणार असल्याचं वॉर्नरनं स्पष्ट केलं आहे. हैदराबादनं आजवर तीन मॅच खेळल्या आहेत. या तीन्ही मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला असून त्यांना अद्याप पॉईंट टेबलमध्ये खातं उघडण्यात अपयश आलं आहे. मिडल ऑर्डरच्या बॅट्समननं केलेली निराशा हे हैदराबादच्या सर्व पराभवाचं मुख्य कारण आहे.
डेव्हिड वॉर्नरनं मुंबई विरुद्धची मॅच हरल्यानंतर सांगितलं की, "हे अत्यंत निराशाजनक आहे. या मॅचमध्ये आम्ही दोघं (वॉर्नर आणि बेअरस्टो) सेट झालो होतो. पण तुमच्या बॅटींगमध्ये खोली नसेल तर तुम्ही मॅच जिंकू शकत नाही, हे सिद्ध झालं आहे. तुम्ही एक पार्टनरशिप केली आणि एक खेळाडू शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला तर सहज विजय मिळू शकतो.
मिडल ऑर्डरनं स्मार्ट क्रिकेट खेळण्याची गरज आहे. या मॅचमध्ये आमच्या बॉलर्सनं चांगली कामहिरी केली. ही विकेट मागच्या मॅचपेक्षा थोडी संथ होती. तुम्ही चुकांमधून शिकायला हवं. बॅटींगमधील खोली ही आमची जबाबदारी आहे. या पराभानंतर आम्हाला पुढं गेलं पाहिजी. केन (विल्यमसन) आमच्या टीममध्ये कधी येईल? यावर मी फिजिओशी चर्चा करणार आहे. आगामी मॅचमध्ये विल्यमसनकडं मोठी भूमिका असेल," असं वॉर्नरनं स्पष्ट केलं.
IPL 2021: थरारक विजयानंतर रोहितनं सांगितली मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू
विल्यमसननं या सिझनमध्ये अजून एकही सामना खेळलेला नाही. त्यानं आयपीएल करियरमधील 53 सामन्यात एकूण 1619 रन काढले आहेत. यामध्ये 15 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या टीममधील समावेशानंतर मिडल ऑर्डर मजबूत बनेल. हैदराबादला याचा आगामी सिझनमध्ये फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: David warner, IPL 2021, Mumbai Indians, Sunrisers hyderabad