सट्टेबाजीत अरबाज खाननंतर समोर आली आणखी दोन निर्मात्यांची नावं

सट्टेबाजीत अरबाज खाननंतर समोर आली आणखी दोन निर्मात्यांची नावं

आयपीएल...सट्टेबाजी...आणि बॉलिवूडचं मोठं कनेक्शन

  • Share this:

मुंबई, ता. 04 जून : आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी 2 जूनला बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची चौकशी करण्यात आली. यात मी 6 वर्षांपासून सट्टेबाजी करत असल्याची कबूलीही अरबाज कडून देण्यात आली. पण दरम्यान, अरबाजच्या या चौकशीतून आयपीएल, सट्टेबाजी आणि बॉलिवूडचा मोठा संबंध असल्याचं समोर आलं आहे, कारण बॉलिवूडच्या आणखी 2 निर्मात्यांची नावं सट्टेबाजीत समोर आली आहे. या दोघांनाही पोलिसांनी नोटिसही दिली आहे.

इंडिया टाईम्सशी बोलताना एंटी एक्सटोरेशन सेल ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यानुसार, 'पराग संघवी आणि मुराद खेतान' अशी या दोन बॉलिवूड निर्मात्यांची नावं आहेत, ज्यांनी सट्टेबाजीमध्ये मोठा हात आहे. हे दोघेही संघवी सोनू जालानचे पार्टनर आहेत.

गंभीर म्हणजे या प्रकरणात मुंबईचे प्रसिद्ध बिल्डर दिलीप लुधानी यांचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चौकशी सुरू आहे. गरज पडल्यास आम्ही अरबाजचीही पुन्हा चौकशी करू असंही शर्मा यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

या सगळ्या खुलाश्यामुळे बॉलिवूड आणि सट्टेबाजी मोठा संबंध असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे खुलाशाअंतर्गत आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता असल्याचंही ठाणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading