'आयपीएल 10'ची दिमाखदार सुरूवात; सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी

'आयपीएल 10'ची दिमाखदार सुरूवात; सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा बंगळुरूवर थरारक विजय, बंगळुरुवर 35 धावांनी मात

  • Share this:

06 एप्रिल :  जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहत असलेल्या IPL2017च्या रणसंग्रामाला काल मोठ्या दिमाखत सुरूवात झाली असून, सनरायझर्स हैदराबादने या सिझनचा पहिला विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 35 धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सने बंगळुरुसमोर विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

टाॅस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांना हा निर्णय चांगलाच महागात पडला. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. शिखर धवनने हैद्राबादला चांगली सुरूवात करून दिली. धवनने 40 धावा ठोकल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर मॉइझेस हेन्रीकने युवीला चांगली साथ देत अर्धशतकी खेळी साकारली. पण तो  52 धावांवर बाद झाला. त्यानंतर युवीने बंगळुरूच्या गोलंदाजांना पुनरागमनाची कोणतीही संधी न देता फटकेबाजी सुरूच ठेवली.

युवराजने बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी, युवीने 3 खणखणीत षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर 27 चेंडूत 62 धावा ठोकल्या,  युवीच्या धाकड फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 208 धावांचे आव्हान बंगळुरू समोर ठेवलं.  या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कडवी टक्कर दिली. मात्र सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही.

208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला 172 धावांची मजल मारता आली. केदार जाधव 16 चेंडूत 31 धावा करुन धावबाद झाला. त्यानंतर बंगळुरुच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, रशीद खान आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर बिपूल शर्मा आणि दिपक हूडा यांनी प्रत्येक एक एक विकेट घेतली.

First published: April 6, 2017, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading