भारत-पाकच्या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

दरम्यान, सामना नियोजित वेळेनुसारच होणार आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2017 02:21 PM IST

भारत-पाकच्या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

04 जून :  भारत-पाकिस्तान यांच्यात आज (रविवारी) होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. लंडनमध्ये जिथे सामना होणार आहे, तिथून अवघ्या 200 किलोमीटर्सवर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने इथल्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सामना नियोजित वेळेनुसारच होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत आज  भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी बर्मिंगहॅमच्या मैदानात भिडणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच लंडनमध्ये शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. पण या हल्ल्याचे पडसाद भारत-पाक सामन्यावरही उमटले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांना या हल्ल्याने घाबरून न जाण्याचा सल्ला ब्रिटनच्या इंटेलिजन्सने दिला आहे.

अवघ्या दोन आठवड्यांच्या आत लंडनमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे. इंटेलिजन्सकडून हल्ल्यासंदर्भातली आणि त्यानंतरच्या दक्षतेची माहिती मिळाल्यानंतर आयसीसीने एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात, "हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. तसंच,  खेळाडूंच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जात असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दोन्ही बोर्डांना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2017 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...