News18 Lokmat

'मुंबई इंडियन्स'चा IPL 10मधल्या प्रवासाचा आढावा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 21, 2017 05:10 PM IST

'मुंबई इंडियन्स'चा IPL 10मधल्या प्रवासाचा आढावा

अमित मोडक, मुंबई

21 मे : सध्या आयपीएलचा 10वा सीझन सुरू आहे. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज (रविवारी) फायनल लढत होणार आहे.

मुंबईच्या आयपीएल सिझनची सुरुवात निराशाजनक झाली होती. पहिल्याच सामन्यात त्यांना पुण्याकडून पराभव स्विकारावा लागला. 184 धावा करुनही मुंबईची टीम विजय मिळवू शकली नाही. पण मुंबईची टीम लगेचच या पराभवातून सावरली आणि कोलकात्ता नाईट रायडर्स विरुद्ध 4 विकेट्सनी विजय नोंदवला. त्यानंतर हैदराबादला पराभवाची धूळ चारली. बंगळुरु विरुद्ध विजय मिळवत, विजयाची हॅट्रीक केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सनी मागे वळून बघितलं नाही. गुजरात लायन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअर डेव्हिल्स... यांना पराभूत करत मुंबई इंडियन्सनं प्ले ऑफच तिकीट मोठ्या दिमाखात बुक केल. पॉईंट टेबल्सवरही मुंबई इंडियन्स अव्वल स्थान गाठलं.

प्ले-ऑफमध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट आमने-सामने येणार होते. पण महेंद्रसिंग धोनीच्या खेळीमुळे पुन्हा एकदा पुण्याची टीम मुंबईवर भारी पडली. पण पॉईंट टेबलवर टॉपला असलेल्या मुंबईला फायनल गाठण्याची आणखी एक संधी होती. त्यानंतर अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स 6 विकेट्स राखून कोलकात्ता नाईट रायडर्सवर विजय मिळवला आणि फायनलच तिकीट काबीज केलं. आता फायनलमध्ये पुन्हा एकदा मुंबई-पुणे आमने-सामने असतील. प्ले-ऑफमधल्या पराभवाचा बदला घेत तिसऱ्यांदा आयपीएलच विजेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आता बघूया बाजी कोण मारतंय ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2017 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...