अरबाज 6 वर्षांपासून लावतो सट्टा, मागच्या वर्षी झालं इतकं नुकसान

अरबाज 6 वर्षांपासून लावतो सट्टा, मागच्या वर्षी झालं इतकं नुकसान

वैवाहिक भांडणं, आर्थिक अडचणी आणि सट्टेबाजी...ही आहे अरबाजची सट्टा कहाणी

  • Share this:

ठाणे, ता. 02 मे : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये सट्टेबाजी केल्या प्रकरणी सलमान खानचा भाऊ अरबाज खानने मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. या प्रकरणात त्याला विचारपूस केली असता, मी मागच्या 6 वर्षांपासून आयपीएलवर सट्टा लावत असल्याची कबूली त्याने दिली आहे.

मागच्या वर्षी आयपीएलच्या सट्टाबाजारात 2 कोटी 75 लाख रुपये हारल्यानंतर त्याने सामने सोनु जालानच्या मदतीने जिंकले आहेत. चौकशीदरम्यान अरबाजने सांगितले की, त्याच्या वैवाहिक जीवनातील विवादामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता, त्याचबरोबर तो आर्थिकदृष्ट्याही कमजोर झाला होता.

मी फक्त आवड म्हणून सट्टा खेळतो, त्याचबरोबर मी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खासकरून आयपीएलवर जास्त पैसे लावले असल्याचंही त्यांने म्हटलं आहे. सट्टा लावण्यावर मला घरातून विरोध असल्याचंही त्याने सांगितलं.

गेल्या 6 वर्षापासून मी सोनु जालानच्या संपर्कात आहे पण सोनु जालानशी त्याची ओळख कशी झाली याबद्दल काही आठवत नसल्याचंही त्याने सांगितलं. पण हरलेल्या पैशांच्या वसूलीसाठी सोनू ब्लॅकमेल करत असल्याचंही अरबाजने सांगितलं.

First published: June 2, 2018, 2:22 PM IST

ताज्या बातम्या