व्हायरल व्हिडिओ : काय खरंच मुंबई इंडियन्स हरल्याने प्रिती झिंटा खुश झाली ?

आयपीएल 2018मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात केली आणि मुंबईच्या या पराभवावर प्रिती झिंटा भन्नाट खुश झाली आहे. तिचा हा आनंद एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 21, 2018 06:06 PM IST

व्हायरल व्हिडिओ : काय खरंच मुंबई इंडियन्स हरल्याने प्रिती झिंटा खुश झाली ?

मुंबई, 21 मे : आयपीएल 2018मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात केली आणि मुंबईच्या या पराभवावर प्रिती झिंटा भन्नाट खुश झाली आहे. तिचा हा आनंद एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 'मुंबई इंडियन्सच्या पराभवावर मी खूप खुश आहे' असं प्रिती म्हणतं आहे.

प्रिती झिंटाचा हा व्हिडओ ट्विटरवर सगळ्यात जास्त व्हायरल झाला आहे आणि तितकाच ट्रोलही झाला आहे. "I am just very happy that Mumbai is not going to the finals..Really happy” म्हणजेच मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात न पोहोचल्यामुळे मी खूप खुश आहे. असं काहीसं या व्हिडिओमध्ये ती बोलत आहे.

आता गंमत अशी की या व्हिडिओला आवाज नाही आहे. पण व्हायरल करण्यासाठी का होईना कोणीतरी व्हिडिओचं लिप्स रिडिंग केलं आणि त्यात ती असंच म्हणाली आहे. हो, आता ही व्हिडिओ किती खरा आहे. हे काही सांगता नाही येत, पण खुप मजेशीर कमेंट्ससह हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2018 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...