चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; युवी, रोहित, धवनचं कमबॅक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 8, 2017 01:06 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; युवी, रोहित, धवनचं कमबॅक

08 मे : जून महिन्यात इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत पंधरासदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून बीसीसीआय या स्पर्धेत भाग घेणार की, नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पण आता बीसीसीआयने टीम इंडियाची नावं जाहीर केली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी :

  Loading...

 • विराट कोहली (कर्णधार)
 • रोहीत शर्मा
 • शिखर धवन
 • अजिंक्य रहाणे
 • युवराज सिंह
 • महेंद्रसिंह धोनी
 • केंदार जाधव
 • हार्दिक पांड्या
 • आर.अश्विन
 • रविंद्र जाडेजा
 • मोहम्मद शमी
 • उमेश यादव
 • भुवनेश्वर कुमार
 • मनिष पांडे
 • जसप्रीत बुमराह

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वापसी झाली आहे. रोहित शर्माने नोव्हेंबर 2016मध्ये जखमी झाल्याने टीममधून बाहेर होता. त्याने शेवटची वन डे न्यूझीलंडसोबत खेळली होती. तर धवनने इंग्लंड विरूद्ध जानेवारीमध्ये 2 वन डे मॅच खेळल्या होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2017 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...