इंग्लंडचा भारतावर 86 धावांनी विजय

इंग्लंडचा भारतावर 86 धावांनी विजय

ग्लंडने विजयासाठी 323 धावांचं टार्गेट दिलं होतं मात्र भारताचा संघ 236 धावांवर गारद झाला.

  • Share this:

इंग्लंड, 14 जुलै : पहिल्या वनडेत पराभूत झालेल्या इंग्लंडने ऐतिहासिक लाॅर्डच्या मैदानावर भारतावर 86 धावांनी विजय मिळवलाय. इंग्लंडने विजयासाठी 323 धावांचं टार्गेट दिलं होतं मात्र भारताचा संघ 236 धावांवर गारद झाला.

टॉस जिंकत इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. त्यानंतर धडाकेबाज बॅटिंग करत सात बाद 322 धावा केल्या.   इंग्लंडने विजयासाठी भारतासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलंय. इंग्लंच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीची सुरूवात खडतर झाली. मात्र कॅप्टन विराट कोहली आणि सुरेश रैनान भारताचा डाव सावरला खरा पण फार काळ टीम इंडियाचा टीकाव लागू शकला नाही.

विराट कोहली 45 तर सुरेश रैना 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर धोणीने कमान सांभाळली पण तोही 37 धावा करून बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. अवघा संघ 236 धावांवर सर्व बाद झाला. इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 1-1ने बरोबरी केलीये.

First published: July 14, 2018, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading