मुंबई, 09 जून : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या लूकसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. आणि आता तर त्याने कहरच केलाय, कारण विराटने त्याच्या दाढीचा विमा काढला आहे. हो, त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
विराटच्या या व्हिडिओमधून दिसतं की त्याचं त्याच्या दाढीवर किती प्रेम आहे. आणि म्हणून आयपीएल 2018मध्ये रवींद्र जडेजाने दिलेल्या दाढी कापण्याच्या आव्हानालाही विराटने नकार दिला होता.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वीमा एजेंटकडून विराट त्याच्या दाढीचा विमा काढत आहे. त्याची कागदपत्रही या व्हिडिओमध्ये दिसतं आहेत. केएल राहुलने त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्याच्या या व्हिडिओची मजाकही उडवली आहे.
दाढीची काळजी घेणं काही अवघड काम नाही आहे कारण, वेगवेगळ्या तेलांनी दाढीची काळजी घेणं सोपं आहे. असं विराटचं म्हणणं आहे. हो माझी दाढी खूप वाढली तर मी त्याला ट्रिम करेन पण कापणार नाही असंही विराट म्हणाला आहे.
Loading...Haha, I knew you were obsessed with your beard @imVkohli but this news of you getting your beard insured confirms my theory. 😂😂 pic.twitter.com/cUItPV8Rhy
— K L Rahul (@klrahul11) June 8, 2018
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा