अमित शहा कपिल देव यांच्या भेटीला, भाजपमध्ये येण्याचं आवाहन

अमित शहा कपिल देव यांच्या भेटीला, भाजपमध्ये येण्याचं आवाहन

भाजप अध्यक्ष अमित शहांनी काल रात्री भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भेट घेतली. मोदी सरकारला 4 वर्षं पूर्ण झाल्यानं भाजपनं दिग्गजांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 2 जून : भाजप अध्यक्ष अमित शहांनी काल रात्री भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भेट घेतली. मोदी सरकारला 4 वर्षं पूर्ण झाल्यानं भाजपनं दिग्गजांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या विकासकामांचं पत्रक शहांनी देव यांना दिलं. 'संपर्क फॉर समर्थन' असं या मोहिमेचं नाव आहे. गेल्या आठवड्यात माजी लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि घटनातज्ज्ञ सुभाष काश्यप यांनाही अमित शहा भेटले होते.

मोदी सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपने एका नव्या मोहिमेला सुरूवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत भाजपचे नेते देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांशी संपर्क करणार असून त्यांना मोदी सरकारने 4 वर्षात केलेल्या कामांची माहिती देणार आहेत.

दरम्यान, या भेटीमध्ये अमित शहा यांनी कपिल देव यांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं, पण मला राजकारणात रस नसल्याचं कपिल यांनी सांगितलं. त्यामुळे मी राजकारणात येणार नसल्याचं कपिल देव यांनी स्पष्ट केलं.

 

First published: June 2, 2018, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading