मुंबईकर क्रिकेटपटू होऊ शकतो BCCI च्या निवड समितीचा प्रमुख, स्पर्धेत आघाडीवर

मुंबईकर क्रिकेटपटू होऊ शकतो BCCI च्या निवड समितीचा प्रमुख, स्पर्धेत आघाडीवर

अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर आता बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदी बसण्याची शक्यता आहे. स्पर्धेत आगरकर सर्वात पुढे आहे. त्याला निवड समितीचा कारभार करण्याचा चांगला अनुभव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी: भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या निवड समितीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचा मुख्य सदस्य म्हणून मुंबईकर असलेल्या खेळाडूची निवड होण्याची शक्यता आहे. हा खेळाडू भारतीय संघात ऑलराऊंडर म्हणून खेळत होता. त्याच्या खेळानं क्रिकेटमधील अनेक सामने गाजवले. अनेक सामने तर त्यानं भारतीय संघाला जिंकून दिलेत आहेत. बॉलिंग ज्या वेगानं तो टाकत होता त्याच वेगानं बॅटिंगही करत होता. बीसीसीआच्या निवड समितीच्या प्रमुखपदी मुंबईकर अजित आगरकर याची निवड होण्याची शक्यता आहे. निवड समितीच्या प्रमुखपदासाठी अजित आगरकर यानं अर्ज केला आहे.

अजित आगरकर होणार BCCIच्या निवड समितीचा प्रमुख

माजी खेळाडू आणि ऑलराऊंडर असलेल्या अजित आगरकर याच्या हाती आता बीसीसीआयच्या निवड समितीची सुत्र असण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यानं बीसीसीआयच्या मुख्य निवड समितीच्या सदस्यासाठी अर्ज केला आहे. निवड समितीच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत अजित आगरकर सर्वात पुढे आहे. आगरकर सौरव गांगुली टीम इंडियाच्या कर्णधार असताना त्याच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

MCAचा कारभार आगरकरनं सांभाळला आहे

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर अजित आगरकर हा उत्तम ऑलराऊंडर खेळाडू आहे. माजी वेगवान गोलंदाज अशी त्याची ओळख आहे. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर अजित आगरकर यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचा प्रमुख म्हणून काम केलं आहे. निवड समितीचा आगरकर याला चांगला अनुभव आहे. त्यामुळं त्यानं बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदासाठी अर्ज केला आहे. सध्या तरी आगरकर निवड समितीच्या प्रमुखपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे. कामाचा अनुभव त्याचा गाठीशी असल्यानं निवड समितीची जबाबदारी तो चांगल्याप्रकारे पार पाडू शकेल असा विश्वास क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केला आहे.

आगरकर सर्वाधिक विकेट घेणारे तिसरे गोलंदाज

अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू होता. त्यानं 288 विकेट घेतले. अनिल कुंबळे आणि ज्वागल श्रीनाथ याच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा अजित आगरकर तिसरा खेळाडू होता. आगरकरनं भारताकडून 191 वनडे मॅच खेळला आहे. तर 26 टेस्ट त्यानं खेळल्या आहे. तीन टी-20 मॅचही अजित आगरकर खेळला आहे. बीसीसीआयनं 24 जानेवारीपर्यंत निवड समितीच्या प्रमुखपदासाठी अर्ज करण्याची तारीख दिली होती. शुक्रवारी अर्ज करण्याची तारीख अखेर संपली आहे.

आगरकरच्या अर्जानंतर स्पर्धेतील चुरस वाढली

अजित आगरकर यानं निवड समितीच्या प्रमुखपदासाठी अर्ज केल्यानंतर स्पर्धेतील चुरस वाढली आहे. अजित आगरकर यांच्यासह अनेक दिग्गज लोकांनी निवड समितीच्या प्रमुखपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळं आता बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदावर कोण विराजमान होणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

First published: January 24, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या