इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना, तीन क्रिकेटपटू विलगिकरणात

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना, तीन क्रिकेटपटू विलगिकरणात

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) टीमच्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

  • Share this:

केप टाऊन, 19 नोव्हेंबर : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका टीमच्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या इतर दोन खेळाडूंना आता विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. या तिन्ही खेळाडूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. तीन खेळाडूंना विलगिकरणात ठेवलं गेलं असलं, तरी दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड या खेळाडूंच्या बदली दुसऱ्या खेळाडूंची टीममध्ये निवड करणार नाही.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) कडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 'एका खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना झालेला खेळाडू आणि त्याच्या संपर्कात आलेल्या दोन खेळाडूंची देखभाल मेडिकल टीम करत आहे. या तिन्ही खेळाडूंना केप टाऊनमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. तिन्ही खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत. दक्षिण आफ्रिका टीमचे डॉक्टर या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत.'

'या परिस्थितीमध्ये बदली खेळाडू दिला जाणार नाही, पण सरावासाठी दोन खेळाडूंना टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. टीम एकमेकांविरुद्ध 21 नोव्हेंबरला सराव सामना खेळणार आहे,' असं बोर्डाने सांगितलं.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने केपटाऊनमध्ये बायो सिक्युर बबलमध्ये प्रवेश करण्याआधी खेळाडू आणि सहकारी कर्मचारी अशा एकूण 50 जणांच्या कोरोना टेस्ट केल्या. इंग्लंडच्या सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन मॅचची टी-20 सीरिज आणि तीन मॅचची वनडे सीरिज होणार आहे. या सीरिजच्या मॅच केप टाऊनमधील न्यूलँड्स आणि पार्लमधील बोलँड या ठिकाणी होणार आहेत.

Published by: Shreyas
First published: November 19, 2020, 4:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या