Home /News /sport /

SA vs ENG : आणखी दोघांना कोरोना, इंग्लंड-दक्षिण आफ्रिका वनडे पुन्हा रद्द

SA vs ENG : आणखी दोघांना कोरोना, इंग्लंड-दक्षिण आफ्रिका वनडे पुन्हा रद्द

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (South Africa vs England) यांच्यातली वनडे मॅच पुन्हा एकदा होऊ शकली नाही. ज्या ठिकाणी दोन्ही टीम थांबल्या आहेत, तिथल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांपैकी दोघांना कोरोना (Corona Virus) ची लागण झाली आहे.

    पर्ल, 6 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (South Africa vs England) यांच्यातली वनडे मॅच पुन्हा एकदा होऊ शकली नाही. ज्या ठिकाणी दोन्ही टीम थांबल्या आहेत, तिथल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांपैकी दोघांना कोरोना (Corona Virus) ची लागण झाल्यामुळे मॅच होऊ शकत नसल्याचं दोन्ही बोर्डांनी सांगितलं आहे. याआधी शुक्रवारपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार होती, पण दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ही मॅच रविवारी पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा एकदा ही मॅच टाळण्यात आली आहे. इंग्लंडकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इंग्लंड टीमच्या खेळाडूंचे नमुने पुन्हा एकदा टेस्टसाठी पाठवण्यात आले होते, आणि सगळ्या खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. शुक्रवारी खेळाडूंची कोरोना टेस्ट झाली नव्हती, कारण एकच दिवस आधी गुरुवारी सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. पण आता हॉटेल कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली, अजूनपर्यंत याचे रिपोर्ट आलेले नाहीत. हे रिपोर्ट आल्यानंतरच मॅच खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या