Home /News /sport /

SA vs ENG : शतक पूर्ण करायलाच विसरला इंग्लंडचा खेळाडू, पाहा मैदानात काय झालं

SA vs ENG : शतक पूर्ण करायलाच विसरला इंग्लंडचा खेळाडू, पाहा मैदानात काय झालं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये इंग्लंड (South Africa vs England) चा 3-0ने विजय झाला आहे. तिसऱ्या वनडेमध्ये डेव्हिड मलान (David Malan) शतक करायलाच विसरला.

    मुंबई, 2 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये इंग्लंड (South Africa vs England) चा 3-0ने विजय झाला आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅटिंग करत 3 विकेट गमावून 191 रन केल्या. इंग्लंडने हे आव्हान 17.4 ओव्हरमध्येच एक विकेट गमावून पूर्ण केलं. जेसन रॉय 25 रनवर माघारी परतला, यानंतर बटलर आणि डेव्हिड मलान (David Malan) यांनी नाबाद शतकी पार्टनरशीप केली. जॉस बटलरने 46 बॉलमध्ये नाबाद 67 रन केले, तर डेव्हिड मलानने 47 बॉलमध्ये 11 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 99 रनची खेळी केली. मलानकडे शतक करण्याची संधी होती, पण आपण शतकाच्या जवळ आहोत, हेच तो विसरला. 98 रनवर खेळत असताना मलानने 18 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर एक रन काढून इंग्लंडला विजय मिळवून दिला. याआधी त्याने तिसऱ्या बॉलवर फोर आणि चौथ्या बॉलवर सिक्स मारली होती. त्यामुळे मलानने चौथ्या बॉलवर फोर मारण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचं शतक पूर्ण झालं असतं. पण असं न करता त्याने एक रन करून इंग्लंडला जिंकवलं 99 नाबाद रनवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या डेव्हिड मलानला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. मी शतकापासून एवढा जवळ आहे, याची कल्पनाही नव्हती, त्यामुळे मी एक रन काढली. मला गणिताचा क्लास लावण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया डेव्हिड मलानने मॅच संपल्यानंतर दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या