Home /News /sport /

India vs South Africa सीरिज होणार का नाही? दक्षिण आफ्रिकेतून आली मोठी Update

India vs South Africa सीरिज होणार का नाही? दक्षिण आफ्रिकेतून आली मोठी Update

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (Cricket South Africa) टीमचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्थानिक मॅच स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या महिन्यामध्ये सुरू होणारी भारत-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली सीरिज अडचणीत सापडली आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 2 डिसेंबर : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (Cricket South Africa) टीमचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्थानिक मॅच स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या महिन्यामध्ये सुरू होणारी भारत-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली सीरिज अडचणीत सापडली आहे. बीसीसीआय (BCCI) लवकरच भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय करणार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यामुळे टीम इंडियाच्या दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. भारतीय टीमला 15 दिवसांनंतर पहिला सामना खेळायचा आहे. 'क्रिकेट दक्षिण आफ्रिका डिव्हिजन टू सीएसए चार दिवसीय स्थानिक सीरिजच्या चौथ्या टप्प्याच्या सगळ्या तीन मॅच स्थगित करत आहे. 2 ते 5 डिसेंबरदरम्यान या मॅच होणार होत्या,' असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितलं आहे. ही सीरिज बायो-बबलमध्ये होत नसून गेल्या काही दिवसांमध्ये काही जणांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत, असंही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितलं. भारताविरुद्धची सीरिज झाली तर यासाठी बायो-बबलचे कडक नियम पाळले जातील. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. वेळ आल्यानंतर वर्षातल्या इतर मॅचबाबतही निर्णय घेतला जाईल, तसंच या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सीएसए बी वर्गाच्या तीन दिवसीय आणि एक दिवसीय मॅचही 2022 पर्यंत स्थगित करण्यात आल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने स्पष्ट केलं आहे. भारतीय टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळणार आहे. ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे, पण बीसीसीआय या दौऱ्याबाबत घाई करणार नाही. भारत सरकारने हिरवा झेंडा दाखवला तरच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या