भारतीय क्रिकेटच्या नव्या वर्षाची सुरुवात पराभवानं; सामन्यातल्या पराभवासह मालिकाही गमावली

भारतीय क्रिकेटच्या नव्या वर्षाची सुरुवात पराभवानं; सामन्यातल्या पराभवासह मालिकाही गमावली

२०१७ सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाने अनेक विक्रमांची नोंद केली. कसोटी, वन-डे किंवा टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतानं अनेक तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचं पाणी पाजलं आहे.

  • Share this:

18 जानेवारी : २०१७ सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाने अनेक विक्रमांची नोंद केली. कसोटी, वन-डे किंवा टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतानं अनेक तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. मात्र नवीन वर्षात भारताची सुरुवातच पराभवानं झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतानं ३ सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. केप टाऊन कसोटीपाठोपाठ सेंच्युरिअन कसोटीमध्येही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यासमोर कोलमडला.

दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला. मालिका गमावलेली असली तरीही भारतानं सेंच्युरिअन कसोटी सामन्यात तब्बल ७ विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या मालिकेतला अखेरचा सामना २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.

या कसोटीच्या निमित्ताने भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने विराट कोहलीनं गमावलेली ही पहिली मालिका ठरली आहे. १९८४ सालानंतर भारताने पहिल्यांदाज १०० धावांच्या आत ७ गडी गमावले आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे.

First published: January 18, 2018, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading