मुंबई, 21 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी वन-डे आज (शुक्रवार) होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकून आफ्रिकेनं सुरूवात दमदार केली आहे. पण, दुसऱ्या सामन्यापूर्वी आफ्रिकेची टीम अडचणीत आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं (CSA) टीमचे हेड कोच मार्क बाऊचरची (Mark Boucher) चौकशी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण?
बाऊचरवर वंशभेदाचा आरोप आहे. त्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यााठी वरिष्ठ अधिवक्ता टॅरी मोताऊ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण (SJN) समितीनं डिसेंबरमध्ये याबाबतचा एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये बाऊचरसह क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे विद्यामान संचालक ग्रॅमी स्मिथ आणि माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्सवर ठपका ठेवण्यात आला आहे.
या सर्वांवर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू पॉल एडम्सनं वांशिक आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. या चौकशीत बाऊचर दोषी आढळल्यास त्याची पदावरून हकालपट्टी होऊ शकते. यापूर्वी SJN समितीचे प्रमुख डुमिसा एनसेबेजा यांनी 235 पानी अहवाल सादर केला होता. मात्र त्यामध्ये त्यांनी आपण कोणताही निष्कर्ष काढण्यास असमर्थ असल्याचे सांगत ही चौकशी पुढे नेण्यासाठी स्वतंत्र आयोगाची शिफारस केली होती.
Photos : टीम इंडियाच्या खेळाडूनी वाढदिवशी केले गर्लफ्रेंडला प्रपोज
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार, 'SJN समितीच्या रिपोर्टमध्ये दोषी आढळलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुढील चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करणे क्रिकेट बोर्डाला बंधनकारक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.' या प्रकरणात 17 जानेवारी रोजी बाऊचरला आरोपपत्र देण्यात आले असून त्यामध्ये त्याच्यावरील सर्व आरोपांची माहिती आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.