• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सौरव गांगुलीने पुन्हा अपलोड केला 'तो' फोटो, आधी झाला ट्रोल आता होतेय प्रशंसा

सौरव गांगुलीने पुन्हा अपलोड केला 'तो' फोटो, आधी झाला ट्रोल आता होतेय प्रशंसा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पुन्हा एकदा त्यांचा दुबईतील फोटो सोशल मीडियावर (Social Media) अपलोड केला आहे.त्या फोटोवर फॅन्सनी टीका केली होती.

 • Share this:
  मुंबई, 9 जून:  बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पुन्हा एकदा त्यांचा दुबईतील फोटो सोशल मीडियावर (Social Media) अपलोड केला आहे. गांगुली यांनी दुबईतील कार रेसिंगमधील फोट इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड केला होता. त्या फोटोवर फॅन्सनी टीका केली होती. त्यानंतर तो फोटो दादाच्या अकाऊंटवरुन डिलीट झाला. आता पुन्हा एकदा गांगुलीने तो फोटो अपलोड केला आहे. गांगुलीने तो फोटो पुन्हा अपलोड करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. 'हा फोटो कसा डिलीट झाला माहिती नाही. पुन्हा एकदा पुनरागमन' असे गांगुली यांनी म्हंटले आहे. बीसीसीआय अध्यक्ष काही दिवसांपूर्वी यूएई दौऱ्यावर होते. त्यावेळी आयपीएल 2021 च्या आयोजनाबाबत त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गांगुली यांनी या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दुबईतील कार रेसिंगचा आनंद घेतला. त्याचा फोटो त्यांनी अपलोड करताच फॅन्सनी त्यांना ट्रोल केले. मात्र आता फॅन्स त्यांना सलाम करत आहेत. त्याचबरोबर तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला फॅन्सनी गांगुली यांना दिला आहे. ICC नं वाढवलं BCCI चं टेन्शन आयपीएलच्या (IPL 2021) उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) होईल, तर फायनल 15 ऑक्टोबरला खेळवली जाईल, असं वृत्त आहे, पण आयसीसीने (ICC) आयपीएलच्या या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. आयपीएलची फायनल 15 ऑक्टोबरला होऊ नये, असं आयसीसीला वाटत आहे. रॉबिन्सननंतर अनेक इंग्लंडचे क्रिकेटपटू अडचणीत, ECB करणार सर्वांची चौकशी आयसीसी 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाचा विचार करत आहे, पण जर आयपीएल फक्त 3 दिवस आधी संपली तर याचा परिणाम वर्ल्ड कपच्या आयोजनावर होईल, असं आयसीसीचं म्हणणं आहे. आयसीसीच्या नव्या भूमिकेमुळे बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: