Home /News /sport /

सचिननं दूर केलं होतं गांगुलीचं टेन्शन, माजी कॅप्टननं सांगितला 'तो' किस्सा

सचिननं दूर केलं होतं गांगुलीचं टेन्शन, माजी कॅप्टननं सांगितला 'तो' किस्सा

टीम इंडियाच्या यशस्वी कॅप्टनमध्ये सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) समावेश होतो. गांगुलीने 25 वर्षांपूर्वी जून महिन्यातच लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण केले होते. त्यानं पहिल्या टेस्टमधील एक किस्सा सांगितला आहे.

    मुंबई, 25 जून: टीम इंडियाच्या यशस्वी कॅप्टनमध्ये सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) समावेश होतो. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जून महिना खास आहे. गांगुलीलं 1996 साली जून महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावले होते. इंग्लंड विरुद्धची ती टेस्ट 20 जून रोजी सुरु झाली. गांगुली 21 जूनला बॅटींगला आला आणि 22 जून रोजी त्याने शतक झळकाले. गांगुलीला आजही ते 25 वर्षांपूर्वीचे पदार्पण स्पष्ट आठवते. त्याने या निमित्ताने एक किस्सा सांगितला आहे. गांगुलीनं 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना सांगितले की, "लॉर्ड्स नेहमीच माझ्यासाठी खास मैदान आहे. या ठिकाणी माझ्या अनेक आठवणी आहेत. खूप कमी जणांना पहिली टेस्ट लॉर्ड्सवर खेळण्याचं भाग्य मिळतं. मला आजही आठवतं की, मी पॉईंटला फिल्डिंग करत होतो तेव्हा मैदान गच्च भरले होते. मी पदार्पणाच्या टेस्टनंतर जेव्हा कधी लॉर्ड्सवर गेलोय, त्यावेळी मला नेहमी छान वाटले आहे." गांगुलीनं पुढे सांगितलं की, " मी तिसऱ्या नंबरवर बॅटींगला आलो होतो. मी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी शतक पूर्ण केलं. त्यावेळी स्टेडियम गच्च भरले होते. मी पदार्पणातच शतक झळकावले होते. त्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नव्हती. माझ्या प्रत्येक शॉटवर प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. मी 100 पूर्ण करुन टी ब्रेकसाठी ड्रेसिंग रूममध्ये परतलो." सचिननं दिली होती ऑफर या चर्चेच्या वेळी गांगुलीनं सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) पदार्पणातील टेस्टमध्ये त्याचं टेन्शन दूर केलं याचा किस्सा सांगितला. " मला आठवतंय की टी ब्रेकच्या दरम्यान मी 100 वर खेळत होतो. मी मानसिक जास्त थकलो होतो. कारण ते माझे पहिलेच शतक होते. ते देखील मी पदार्पणातील टेस्टमध्ये पूर्ण केले होते. मी बॅटच्या चारही बाजूला टेप लावत होतो. कारण, बाऊन्स बॉल लागल्यानं बॅट नरम झाली होती. त्यावेळी सचिन माझ्याजवळ आला आणि त्याने मला चहा घे आणि आराम करण्याचा सल्ला दिला. मी ड्रेसिंग रुमध्ये गेलो त्यावेळी प्रत्येक जण माझ्या खेळाचं कौतुक करण्यासाठी ड्रेसिंग रुमच्या बाहेर उभा होता. ‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली भावुक सौरव गांगुलीनं पदार्पणातील टेस्टमध्ये 131 रन काढले होते. त्याने एकूण टेस्ट कारकिर्दीमध्ये 113 टेस्टमध्ये 42 पेक्षा जास्त सरासरीनं 7212  रन काढले. यामध्ये 16 शतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Sachin tendulkar, Sourav ganguly

    पुढील बातम्या