अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवर सौरभ गांगुलीने केला पहिल्यांदाच खुलासा!

अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवर सौरभ गांगुलीने केला पहिल्यांदाच खुलासा!

या आधी मी कधीही अमित शहांना भेटलो नव्हतो. त्यामुळे याचं राजकारण केलं जावू नये.

  • Share this:

कोलकाता 15 ऑक्टोंबर : बीसीसीआयच्या अध्‍यक्षपदी (BCCI President) निवड झाल्यानंतर सौभव गांगुली आणि अमित शहा यांच्या भेटीबाबात अनेक तर्क लावले जात होते. अनेक शक्यताही व्यक्त केल्या जात होत्या. सौरभला भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न होत असल्याबद्दलही बोललं जात होतं या सर्व शक्यतांवर BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पहिल्यांदाच खुलाला केलाय. ते म्हणाले, अमित शहांना मी पहिल्यांदाच भेटलो. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही. या आधी मी कधीही अमित शहांना भेटलो नव्हतो. त्यामुळे याचं राजकारण केलं जावू नये.

सौरभ गांगुलीला भेटण्यात काहीही गैर नाही असा खुलासा अमित शहांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. सौरभच्या निवडीत अमित शहांची मोठी भूमिका होती असं बोललं जातय त्या पार्श्वभूमीवर सौरभ गांगुलीने हे स्पष्टिकरण दिलंय.

अध्यक्षपदी अशी झाली निवड

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज याबाबत घोषणा केली. 13 ऑक्टोबरला रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत सौरव गांगुलीच्या नावावर अधिकृच शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान सोमवारी, 14 ऑक्टोबरला राजीव शुक्ला यांनी याबाबत नियुक्ती केली.

BCCIचा अध्यक्ष होण्याआधीच गांगुलीला बसला 7 कोटींचा फटका!

राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती देताना, “आम्ही सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तरी, 23 ऑक्टोबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल”, असे सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची निवडणुक होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीनं एकट्यानं फॉर्म भरल्यामुळं बिनविरोधात निवड झाली आहे.

‘अब अंडरग्राऊंड होने का समय है’! गांगुली अध्यक्ष झाल्यावर नेटकऱ्यांचा धुमाकूळ

तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव असतील. मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. जर गांगुलीची आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 10:24 PM IST

ताज्या बातम्या