मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धक्कादायक! सौरव गांगुलीसोबत खेळणाऱ्या भारतीय बॉलरवर चहा विकण्याची वेळ

धक्कादायक! सौरव गांगुलीसोबत खेळणाऱ्या भारतीय बॉलरवर चहा विकण्याची वेळ

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) सोबत खेळलेला भारतीय बॉलर संकटात सापडला आहे. त्याच्यावर रोजची जगण्याची गरज भागवण्यासाठी चहा विकण्याची वेळ आली आहे.

मुंबई, 7 जुलै: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) सोबत खेळलेला    भारतीय बॉलर संकटात सापडला आहे. त्याच्यावर रोजची जगण्याची गरज भागवण्यासाठी चहा विकण्याची  वेळ आली आहे. प्रकाश भगत (Prakash Bhagat) असं या बॉलरचं नाव असून त्यानं आसामचं रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) प्रतिनिधित्व केलं आहे.

आसामकडून 2009-10 च्या सिझनमध्ये रणजी क्रिकेट खेळणाऱ्या प्रकाशनं 2003 साली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) ट्रेनिंग घेतली होती. त्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या गांगुलीला त्याने बॉलिंग केली होती. सचिन तेंडुलकर, झहीर खान, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग या प्रमुख खेळाडूंना भेटण्याची संधी देखील त्याला मिळाली होती.

वडिलांच्या निधनानंतर सोडलं क्रिकेट

प्रकाशनं एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार,' 2011 साली वडिलांच्या निधनानंतर त्याला क्रिकेट सोडावे लागलेो. वडील आणि मोठा भाऊ चाट विकत असत. वडिलांच्या निधनानंतर मोठ्या भावाची तब्येत देखील बिघडली. कोरोना व्हायरसमुळे त्याच्या कामावर परिणाम झाला असून त्यामुळे आता चहा विकण्याची वेळ आली आहे.'

अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल, राशिद खानला मिळाली नको असलेली जबाबदारी

प्रकाशने पुढे सांगितले की, ' यापूर्वी आमचा रोजचा खर्च कसाबसा भागत होता. मात्रआता परिस्थिती आणखी बिघडली आहे. चहाच्या दुकानातून मिळणारा पैसा रोजची गरज भागवण्यासाठी अपुरा आहे. त्याच्या टीममधील सहकाऱ्यांना नोकरी लागली. मात्र मी आणि माझा परिवार सध्या रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहोत.'

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Sourav ganguly, Sports, Tea