Sourav Ganguly Health Updates: गांगुली पुन्हा हॉस्पिटलमध्ये, वाचा काय होणार दादावर उपचार!

Sourav Ganguly Health Updates: गांगुली पुन्हा हॉस्पिटलमध्ये, वाचा काय होणार दादावर उपचार!

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) बुधवारी कोलकात्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 28 जानेवारी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अध्यक्ष  सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) बुधवारी कोलकात्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गांगुलीच्या छातीमध्ये दुखत असल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी दोन जानेवारी रोजी गांगुलीला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गरज भासली तर गांगुलीच्या शरीरात आणखी एक स्टेंट लावण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी त्याचवेळी दिली होती. आता अपोलो हॉस्पिटलनं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी आणखी एक स्टेंट बसवण्यात येईल.

काय होणार गांगुलीवर उपचार?

अपोलो हॉस्पिटलनं दिलेल्या माहितीनुसार डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सुरज मंडल गांगुलीवर सध्या उपचार करत आहेत. गुरुवारी डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. आफताब खान यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यावर स्टेनिंग केलं जाईल. यापूर्वी गांगुलीची प्रकृती स्थिर असून तो नेहमीच्या तपासणीसाठी आल्याची माहिती हॉस्पिटलनं दिली होती.

(हे वाचा-IPL 2021: ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव, वाचा कोणत्या टीमकडं किती आहेत पैसे)

गांगुलीच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी अपोलो हॉस्पिटलनं चार सदस्यीय मेडिकल बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. गांगुली कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादाला मंगळवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागलं होतं. बुधवारी देखील तो अस्वस्थ होता. त्याला चक्कर येत होती तसंच छातीमध्ये सौम्य दुखत होतं असं वृत्त ‘पीटीआय’ नं दिलं आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलमध्ये गांगुलीचा ECG काढण्यात आला. त्यामध्ये काही बदल जाणवले.

(हे वाचा-विराट कोहली अडचणीत! हायकोर्टाने पाठवली नोटीस, वाचा काय आहे प्रकरण)

गांगुलीची तब्येत पुन्हा खालवल्याची माहिती मिळताच कोलकाता पोलीस त्याच्या घरी पोहचले. त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावं यासाठी ग्रीन कॉरीडोरची बनवण्यात आला होता. गांगुलीला 2 जानेवारी रोजी घरामध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्याला वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गांगुलीवरील उपचारासाठी नऊ सदस्यांच्या मेडिकल बोर्डाची त्यावेळी स्थापना करण्यात आली होती. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

Published by: News18 Desk
First published: January 28, 2021, 9:58 AM IST

ताज्या बातम्या