सौरव गांगुलीने घेतला क्रांतिकारी निर्णय: IPL मध्ये असतील 5 अंपायर!

सौरव गांगुलीने घेतला क्रांतिकारी निर्णय: IPL मध्ये असतील 5 अंपायर!

अंपायरची एक चूक आणि एका संघाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव होतो. आयपीएलच्या गेल्या हंगामात असेच काही चित्र पहायला मिळाले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: अंपायरची एक चूक आणि एका संघाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव होतो. आयपीएलच्या गेल्या हंगामात असेच काही चित्र पहायला मिळाले होते. स्पर्धेत मैदानातील अंपायर्सनी अनेक वेळा नो बॉल असताना तो दिला नाही आणि त्याचा फटका एका टीमला झाला तर दुसऱ्याला पराभवाला सामोरे जावे लागले. अंपायर्सनी केलेल्या या चुकांमुळे मोठा वाद देखील झाला होता. पण आयपीएलच्या येणाऱ्या हंगामात अंपायर्सची ही चूक रोखली जाणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली(Sourav Ganguly)ने आयपीएलमधील अंपायरची ही चूक सुधारण्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये नो बॉल (IPL No Ball)चेक करण्यासाठी एक स्पेशल अंपायरची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबईत झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत नो बॉलच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर गांगुलीने हा निर्णय घेतल्याचे समजते. बोर्डाच्या बैठकीत गांगुलीने नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसरा पंच काम करतो. पण त्याशिवा फक्त नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी अंपायर नियुक्ती केली जाणार आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या एका सीनिअर सदस्याने दिलेल्या माहितीनुसार सर्व काही ठरल्यानुसार झाले तर आयपीएलच्या आगामी हंगामात नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी एक स्पेशल अंपायर असेल. हा अंपायर आता असेलल्या चार अंपायरपेक्षा वेगळा असेल. याचे काम फक्त गोलंदाजाकडून फ्रंटफूट नो बॉलवर नजर ठेवण्याचे असेल.

आयपीएलमध्ये हा निर्णय लागू करण्याआधी बीसीसीआयने चाचणी म्हणून याचा वापर केला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात फक्त नो-बॉलवर नजर ठेवण्यासाठी एका अंपायरची नियुक्ती केली होती. गांगुलीने केलेली ही चाचणी यशस्वी ठरल्याने आता आयपीएलमध्ये देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो.

गेल्या हंगामात मुंबई आणि बेंगळूरू यांच्यातील सामन्यात अंपायर्सकडून मोठी चूक झाली होती. अशीच मोठी चूक मुंबई आणि चेन्नई यांच्या सामन्यात देखील झाली होती. या दोन्ही सामन्यात नो बॉलचा फटका बेंगळूरू आणि चेन्नई या दोन्ही संघांना बसला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 11:36 AM IST

ताज्या बातम्या