मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Virat Kohli : मैदानात फ्लॉप पण इन्स्टाग्रामवर सुपरहिट, एका पोस्टसाठी मिळणारी रक्कम वाचून येईल चक्कर!

Virat Kohli : मैदानात फ्लॉप पण इन्स्टाग्रामवर सुपरहिट, एका पोस्टसाठी मिळणारी रक्कम वाचून येईल चक्कर!

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आजही सोशल मीडियावर किंग आहे. तो एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी किती रक्कम घेतो माहिती आहे का?

    मुंबई, 21 जुलै : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. त्यानं शतक झळकावून आता अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही तो काहीच कमाल करू शकला नाही. त्याच्या टीममधील जागेवर प्रश्न विचारले जात आहेत. मैदानात सातत्यानं फ्लॉप होणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर दरारा कायम आहे. विराट कोहली इन्स्टाग्रामवर एका प्रायोजित पोस्टसाठी तब्बल 8 कोटी 70 लाख रूपये घेतो. एका पोस्टच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणारा तो आशियाई सेलिब्रेटी ठरला आहे. hopperhq नं 2022 मधील इन्स्टाग्राम रिच लिस्ट प्रसिद्ध केलीय. या यादीवरून विराट आजही सोशल मीडियावर सुपर हिट असल्याचं सिद्ध झालंय. विराट मागच्या वर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 5 कोटी घेत होता. तसंच तो जागतिक यादीमध्ये 18 व्या क्रमांकावर होता. वर्षभरात त्याची फिस 3 कोटी 40 लाखांनी वाढलीय. त्याच्या जागतिक क्रमावारीतही सुधारणा झाली असून त्यानं 14 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांच्यानंतर  विराटचा नंबर आहे. रोनाल्डो एका पोस्टचे 19.17 कोटी तर मेस्सी एका पोस्टचे 14.21 कोटी घेतो. hopperhq यादीमधील भारतीयांमध्ये विराट कोहलीनंतर बॉलिवूड अभिनेतेत्री प्रियांका चोप्राचा नंबर आहे. सध्या अमेरिका मुक्कामी असलेली ही 'देसी गर्ल' एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून 3.38 कोटी रूपयांची कमाई करते. प्रियांका जागतिक यादीमध्ये 27 व्या क्रमांकावर आहे. IND vs WI : टीम इंडियासमोर खडतर पेपर, 4 अवघड प्रश्नांची शोधावी लागणार उत्तरं विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 20 कोटींपेक्षा जास्त आहे. तो सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा क्रिकेटपटू आहे. इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याचे 46. 9 कोटी फॉलोअर्स आहेत. तर लियोनेल मेस्सी 35.1 कोटी फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, Instagram, Instagram post, Virat kohli

    पुढील बातम्या