Home /News /sport /

श्रीलंकेच्या खेळाडूची मॅच दरम्यान दुखावली छाती, मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रीलंकेच्या खेळाडूची मॅच दरम्यान दुखावली छाती, मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रीलंका विरूद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच मिरपूरमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना घडली.

    मुंबई, 23 मे : श्रीलंका विरूद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच मिरपूरमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेचा बॅटर कुशल मेंडिसला (Kusal Mendis) फिल्डिंग करत असताना छातीमध्ये कळ आली. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काय घडला प्रकार? बांगलादेशच्या इनिंगमधील 23 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी फिल्डिंग करत असलेल्या मेंडिसला अस्वस्थ वाटू लागले आणि तो जमिनीवरच आडवा झाला. त्यानंतर मेडिकल टीम मैदानात आली आणि त्यांनी मेंडिसला तपासले. या टीमनं मेंडिसला मैदानाच्या बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाताना देखील मेंडिसला त्रास होत होता. तो छातीवर हात ठेवून ड्रेसिंग रूमकडे गेला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर  मंजूर हुसेन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ,'मेंडिसला मॅचपूर्वी डिहायड्रेशनचा त्रास होत होता. त्यामुळे त्याची छाती दुखावली असावी. मेंडिसच्या पोटाचा आजारही असू शकतो,' असा अंदाज त्यांवी व्यक्त केलाय. मेंडिस हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहणार आणि मिरपूर टेस्टमध्ये पुढे खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मेंडिससनं चट्रोग्राममध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. तसंच दुसऱ्या दिवशी वेगवान 48 रन केले. पहिल्या टेस्टमध्ये हवामान चांगलेच प्रतिकूल होते. प्रखर उष्णतेमुळे खेळाडू चांगलेच त्रस्त झाले होते. IPL 2022 : विमानतळावरून थेट मैदानात पोहचला पंजाबचा खेळाडू, 56 बॉलमध्ये केलं शतक बांगलादेशचा बॅटर तमिम इक्बालला स्नायू दुखावल्यामुळे तिसऱ्या दिवशी रिटायर हर्ट व्हावं लागलं. ऑन फिल्ड अंपायर रिचर्ड कॅचलबरो यांनीही उष्णतेमुळे चौथ्या दिवशी मैदान सोडले. टेस्ट मॅचच्या दरम्यान ड्रिंक ब्रेकच्या शिवाय देखील खेळाडू सतत पाणी पित होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh, Cricket news, Sri lanka

    पुढील बातम्या