सीमारेषेवर पकडला अफलातून झेल, खेळाडूचं होतंय कौतुक; पाहा VIDEO

सीमारेषेवर पकडला अफलातून झेल, खेळाडूचं होतंय कौतुक; पाहा VIDEO

सीमारेषेवर उंच उडी मारून एका हाताने घेतलेला हा अफलातून झेल चर्चेचा विषय झाला असून फिल्डरचे कौतुक होत आहे.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ झालाय असं म्हटलं जातं. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पडतो. तरीही अनेकदा गोलंदाजही कमाल करतात. याशिवाय फिल्डरसुद्धा सामन्याचं चित्र बदलतात. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूने झेल घेतला पण सीमारेषेचा अंदाज न आल्यानं तो षटकार ठरला. यामुळे सामन्याचा निकाल बदलला.

सध्या आयसीसी टी20 वर्ल्ड कप क्वालिफायरची स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंगापूरनं नेपाळला पराभूत केलं. या सामन्यात सिंगापूरच्या क्रिकेटपटूनं घेतलेला झेल चर्चेत आला आहे. सीमारेषेवर उंच उडी मारून अफलातून झेल घेतला. यामुळे संघाचा विजय सोपा झाला.

नेपाळचा फलंदाज शरद वेसावकरनं सिंगापूरचा गोलंदाज अनंत कृष्णाच्या चेंडूवर उंच फटका मारला. चेंडू सीमारेषेवर उभा असलेल्या जनक प्रकाशनं झेल घेतल्यानंतर सगळेच हैराण झाले. त्यानं चेंडू आवाक्यात येईपर्यंत वाट बघितली आणि उंच उडी मारून एका हाताने चेंडू पकडला. त्यानंतर आपण सीमारेषेबाहेर जाणार नाही याचीही काळजी घेतली. त्याच्या या उंच उडी मारून घेतलेला झेल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सिंगापूरने प्रथम फलंदाजी करताना टिम डेव्हिडच्या(77) अर्धशतकाच्या आणि रोहन रंगराजन (49) , मनप्रीत सिंग (42) यांच्या खेळीच्या जोरावर 6 बाद 191 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळच्या संघाला 109 धावांपर्यंत मजल मारता आली. सिंगापूरनं हा सामना 82 धावांनी जिंकला.

VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले

Published by: Renuka Dhaybar
First published: August 3, 2019, 8:02 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading