रमाकांत आचरेकरांच्या 'या' ट्रॅजेडीशी सचिन आणि विराटचंही आहे साधर्म्य

आचरेकरांच्या या कृतीचा सचिन तेंडुलकरच्या मनावर फार खोल परिणाम झाला. काही वर्षांनी आचरेकर सरांसोबत जे झाले तसेच काहीसे सचिनसोबतही झाले.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 12:47 PM IST

रमाकांत आचरेकरांच्या 'या' ट्रॅजेडीशी सचिन आणि विराटचंही आहे साधर्म्य

मुंबई, ०३ जानेवारी २०१९- क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला गमावलं. ज्यांच्याकडून क्रिकेटची बाराखडी शिकली ते पद्मश्री रमाकांत आचरेकरांनी काल बुधवारी अखेरचा श्वास घेतला ते ८७ वर्षांचे होते. भारतीय क्रिकेटमध्ये आचरेकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी देशाला फक्त सचिन आणि विनोद दिले नाहीत, तर एकाहून एक उत्तम खेळाडू आचरेकरांनी घडवले.

सचिन जेव्हा ११ वर्षांचा होता तेव्हा रमाकांत आचरेकरांनी त्याला क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. सचिनमध्ये त्यांना एक वेगळी ऊर्जा दिसली. त्यामुळेच त्यांनी सचिनला प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. गुरू शिष्याच्या या जोडीत एका गोष्टीचं साम्य आहे. हे दोघंच नाही तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही या दोघांच्या दुःखाशी साम्य आहे.

क्रिकेटपेक्षा मोठं काहीच नाही-

सचिनने एका मुलाखतीत सांगितले की, आचरेकरांच्या घरात कोणाचा तरी मृत्यू झाला म्हणून सर्व विद्यार्थी सरांना भेटायला त्यांच्या घरी गेले. मात्र घरी गेल्यावर त्यांना कळलं की सर शिवाजी पार्कमध्ये मुलांना शिकवायला गेले. कुटुंबात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होऊनही आचरेकर मुलांना क्रिकेट शिकवण्यासाठी स्वतःचं दुःख गिळून पार्कात गेले होते. सरांच्या या कृतीने सचिनला तेव्हा मोठा धक्का बसला होता. आचरेकर सरांसोबत जे झाले तसेच काहीसे सचिनसोबतही झाले. १९९९ वर्ल्ड कपदरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी सचिनच्या वडिलांचं निधन झालं. सचिन त्याचदिवशी तातडीने मुंबईत आला. अंत्यसंस्कारांनंतर तो पुहा इंग्लंडसाठी रवाना झाला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतकी खेळी खेळली.

विराटसोबतही झाले असेच काहीसे-

Loading...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आयुष्यातही अशी दुःखद घटना घडली. विराट १२ वर्षांपूर्वी दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगतही विराटने कर्नाटकविरोधात खेळण्याचा निर्णय घेतला. कारण तेव्हा दिल्लीवर फॉलऑन मिळण्याची भीती होती. कोहलीने त्या सामन्यात ९० धावा करुन आपल्या संघाला फॉलऑल मिळण्यापासून वाचवले होते. यानंतर त्याने आपल्या वडिलांचं अंत्यसंस्कार केले.


VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...