Home /News /sport /

IND vs AUS : ...म्हणून कामगिरी खराब होत आहे, श्रेयस अय्यरने सांगितलं कारण

IND vs AUS : ...म्हणून कामगिरी खराब होत आहे, श्रेयस अय्यरने सांगितलं कारण

ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर आपल्याविरुद्ध शॉर्ट बॉलिंग करत असल्यामुळे आपण खूश असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने दिली आहे.

    कॅनबेरा, 2 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर आपल्याविरुद्ध शॉर्ट बॉलिंग करत असल्यामुळे आपण खूश असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने दिली आहे. पहिल्या वनडेमध्ये जॉस हेजलवूडने अय्यरला बाऊन्सर टाकून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, तर दुसऱ्या वनडेमध्ये त्याने 36 बॉलमध्ये 38 रन केले. ऑस्ट्रेलियाने टीम बाऊन्सर टाकून अय्यरला निशाणा बनवण्याची रणनीती अवलंबली आहे. याबाबत खुद्द श्रेयस अय्यरला विचारलं असता, याबाबत मला आनंद आहे, कारण मी हे आव्हान म्हणून स्वीकारतो. चांगली कामगिरी करण्यासाठी यामुळे मला प्रेरणा मिळेल, असं तो म्हणाला. 'बाऊन्सरचा सामना करणं मानसिकता आणि नेटमध्ये थोड्या बदलांवर अवलंबून आहे. खेळपट्टीवर तुम्ही कसे उभे आहात, जास्त वाकण्याऐवजी तुम्हाला सरळ उभं राहणं गरजेचं असतं, त्यामुळे बाऊन्सर खेळणं सोपं जातं,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली. दोन विचारांमुळे आऊट झालो पहिल्या मॅचमध्ये शॉर्ट बॉल खेळताना संभ्रमात सापडल्यामुळे आऊट झाल्याचं अय्यरने मान्य केलं. 'मला माहिती होतं की जॉस हेजलवूड शॉर्टपीच बॉलिंग करेल. पण माझ्या डोक्यात दोन गोष्टी होत्या. पूल करायचा का अपर कट करायची, या गोंधळात मी सापडलो,' असं श्रेयस अय्यरने सांगितलं. 'आयपीएलवेळी युएईमधल्या खेळपट्ट्या वेगळ्या होत्या. सरावावेळची खेळपट्टीही वेगळी होती. मॅचमधल्या खेळपट्टीवर उसळी जास्त होती, या गोष्टी आव्हानात्मक आहेत, पण याची मजा घेत आहे,' असं अय्यर म्हणाला. 'टी-20 आणि 50 ओव्हरचा सामना यात खूप फरक आहे. या गोष्टी आव्हानात्मक आहेत, कारण बॉलरला 10 ओव्हर बॉलिंग करून पुन्हा 50 ओव्हर फिल्डिंगही करावी लागते. बॉलरना खूप आव्हानांचा सामना करावा लागत आहे, कारण या सगळ्यांवर आयपीएलमध्ये बॉलिंग करण्याचा दबाव होता,' असं वक्तव्य अय्यरने केलं. 'आयपीएलमध्ये बॉलरनी लागोपाठ 14 मॅच बॉलिंग केली आणि इकडे येऊन क्वारंटाईन झाले. कूकाबूरा बॉलने बॉलिंग करायलाही खेळाडूंना अडचणी येत आहेत,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या