• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: श्रेयस अय्यरनं दिल्लीच्या कॅप्टनसीवर मौन सोडलं, पंतबाबत केलं मोठं वक्तव्य

IPL 2021: श्रेयस अय्यरनं दिल्लीच्या कॅप्टनसीवर मौन सोडलं, पंतबाबत केलं मोठं वक्तव्य

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानं टीमच्या कॅप्टनसीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानं टीमच्या कॅप्टनसीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. श्रेयसच्या खांद्याला यावर्षी दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा (IPL 2021, Phase 1) खेळू शकला नव्हता. त्यामुळे दिल्लीच्या मॅनेजमेंटनं ऋषभ पंतची (Rishabh Pant) कॅप्टन म्हणून नियुक्ती केली होती. कोरोनाच्या कारणामुळे आयपीए स्पर्धा मे महिन्यात स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता या स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यावेळी श्रेयसचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. पण, दिल्लीनं ऋषभ पंतलाच कॅप्टन म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये (DC vs SRH) श्रेयसनं नाबाद 47 रनची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. या विजयानंतर बोलताना श्रेयसनं कॅप्टनसीच्या प्रश्नावर मौन सोडलं. 'मला कॅप्टन करण्यात आलं त्यावेळी माझी मानसिक स्थिती वेगळी होती. माझी क्षमता आणि सहनशक्तीवर याचा चांगला परिणाम झाला. गेल्या दोन वर्षांमध्ये मला कॅप्टन म्हणून फायदा झाला आहे.' असं अय्यरनं सांगितलं. दिल्लीच्या बॉलरनं टाकला सर्वात फास्ट बॉल, रॉकेटच्या वेगानं केली हैदराबादची चाळण ऋषभ पंतला कॅप्टन म्हणून कायम ठेवण्याच्या निर्णयावर तो म्हणाला की, ' हा फ्रँचायझीचा निर्णय आहे. त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचा मी आदर करतो. ऋषभनं या सिझनच्या सुरुवातीपासूनच चांगलं नेतृत्त्व केलं आहे. त्यामुळे सिझन संपेपर्यंत तोच कॅप्टन असावा असं त्यांना वाटलं, मी या निर्णयाचा पूर्ण आदर करतो.' IPL 2021: शिखर धवनचा सलग 6 व्या वर्षी रेकॉर्ड, विराट-रोहितला टाकलं मागं टीमचा कॅप्टन नसल्यानं मोठा फरक पडला नसल्याचंही श्रेयसनं यावेळी सांगितलं. 'मी आता बॅटींगवर जास्त लक्ष देत आहे. मी कॅप्टन होतो त्यावेळी मला दबावात खेळणे जास्त आवडत होते. मी दबावामध्ये चांगली कामगिरी करु शकतो. मी या मॅचमध्ये मैदानात उतरलो त्यावेळी मॅच जिंकण्याचा दबाव होता. पिचवर बॉल असमान उसळत होता. त्यावेळी शेवटपर्यंत खेळून मॅच जिंकायची हाच विचार मी केला होता.' असं त्यानं स्पष्ट केलं.
  Published by:News18 Desk
  First published: