Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीने पुढची IPL खेळावी का नाही? भारताचा माजी विकेट कीपर म्हणतो...

धोनीने पुढची IPL खेळावी का नाही? भारताचा माजी विकेट कीपर म्हणतो...

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला पहिल्यांदाच प्लेऑफची फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या फिटनेसवरदेखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यानंतर आता भारतीय टीमचे माजी विकेटकिपर बॅट्समन किरण मोरे (Kiran More) यांनी धोनीबद्दलचं त्यांचं मत मांडलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला पहिल्यांदाच प्लेऑफची फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या फिटनेसवरदेखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या स्पर्धेत धोनीला बॅटिंगबरोबरच फिटनेसमध्येदेखील संघर्ष करावा लागला. वर्षभराच्या विश्रांतीनंतर क्रिकेटमध्ये परतलेल्या धोनीला आपला फॉर्म परत मिळवायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. ही स्पर्धा धोनीसाठी वैयक्तिक आणि सांघिक दृष्टिनेही फारशी चांगली गेली नाही. या संपूर्ण स्पर्धेत धोनीला एक अर्धशतकदेखील झळकावता आल नाही.

मागच्या वर्षी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेट खेळला नव्हता. त्यामुळे वर्षभराने पदार्पण करणाऱ्या धोनीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. या स्पर्धेत धोनीने 14 सामन्यांमध्ये 116 च्या स्ट्राईक रेटने केवळ 200 रन केल्या. त्यामुळे धोनीच्या खेळाबरोबरच फिटनेसवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तीनदा विजेता ठरलेल्या चेन्नईला या स्पर्धेत 14 सामन्यांमध्ये फक्त 6 सामन्यांत विजय मिळवता आला. पॉईंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर राहिली. परंतु या कामगिरीनंतर देखील आपण 2021 च्या आयपीएलमध्ये दिसणार असल्याचे धोनीने स्पष्ट केलं होतं.

यंदाच्या आयपीएलमधल्या चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात धोनीला त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीविषयी विचारण्यात आले असता, त्याने आपण पुढील आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता भारतीय टीमचे माजी विकेटकिपर बॅट्समन किरण मोरे (Kiran More) यांनी धोनीच्या या निर्णयावर आपले मत मांडले आहे. टी-20 लीगमधून निवृत्ती घ्यायची की नाही, हा निर्णय पूर्णपणे धोनीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जर धोनीचे शरीर त्याला पुढील स्पर्धा खेळण्यासाठी साथ देत असेल, तर त्याने पुढील स्पर्धा नक्की खेळावी. त्यामुळे त्याने पुढे खेळावे की नाही याचं उत्तर त्याच्यापेक्षा चांगले कुणीही देऊ शकत नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडले आहे. पुढे त्यांनी म्हटले, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तो सक्षम असेल, तर त्याने ही स्पर्धा खेळावी. त्याचे शरीर त्याला साथ देत आहे की नाही, याचे उत्तम उत्तर धोनीचं देऊ शकत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

आयपीएलमधून निवृत्ती घ्यायची की नाही हा पूर्ण निर्णय धोनीचा आहे. धोनीसाठी वय हा केवळ एक आकडा आहे. ख्रिस गेलं सध्या 41 वर्षांचा आहे. परंतु अजूनही उत्तम कामगिरी करत असल्याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. धोनीच्या क्षमतेवर आपण शंका उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे त्याला खेळायचे असेल तर आणखी काही काळ खेळू शकतो, अशी प्रतिक्रिया किरण मोरे यांनी दिली.

दरम्यान, किरण मोरे यांनी पुढील स्पर्धेसाठी चेन्नईला पाठिंबा दर्शवला आहे. तीनवेळा स्पर्धा जिंकणे सोपी गोष्ट नाही. पुढील लिलावामध्ये चेन्नईला उत्तम खेळाडू घेणे गरजेचे आहे. 13 वर्षांमध्ये एखादं वर्ष तुमच्यासाठी खराब जाऊ शकतं. त्यामुळे चेन्नईच्या या वर्षीच्या कामगिरीच्या आधारावर त्यांना बोलणं बरोबर होणार नाही. धोनी महान खेळाडू असून तीन विजेतेपद पटकावणे सोपे नसल्याचे आपण विसरू नये.

First published: