टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अख्तरने सुचवलं भारताच्या दिग्गज खेळाडूचं नाव!

बीसीसीयआने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 09:17 AM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अख्तरने सुचवलं भारताच्या दिग्गज खेळाडूचं नाव!

कराची, 24 जुलै : ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान संघाच्या मुख्य प्रशिक्षकांसह स्टाफ मेंबर्ससाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा रवी शास्त्री प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार की नवीन प्रशिक्षक संघाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताचा प्रशिक्षक सौरव गांगुली व्हावा असं म्हटलं आहे.

अख्तर म्हणाला की, भारताचं क्रिकेट आणखी सुधरायचं असेल तर गांगुलीनं बीसीसीआयचा अध्यक्ष झालं पाहिजे. तो अध्यक्ष होणार नसेल तर संघाचा प्रशिक्षक झालं पाहिजे. त्याचासारखा चांगला, हुशार आणि तल्लख बुद्धीचा माणूस संपूर्ण भारतात नाही. गांगुली प्रशिक्षक झाला तर यापेक्षा भारतीय क्रिकेटसाठी चांगलं काहीच असू शकत नाही.

दरम्यान, भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री अपात्र ठरणार आहेत. याचे कारण म्हणजे बीसीसीआयनं घातलेल्या अटी. बीसीसीआयनं घातलेल्या अटींनुसार मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षण देण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत. तसेच, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत. त्याचबरोबर त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत.

रवी शास्त्री 2014मध्ये ते भारतीय संघाचे संचालक म्हणून कार्यरत होते. शास्त्री यांनी 1982 ते 1992 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2007 साली बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेचा अनुभव वगळता त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नाही. तर, 2014च्या इंग्लंड दौऱ्यात शास्त्रींची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेव्हा डंकन फ्लेचर हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि 2015 च्या वर्ल्ड कपनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर जून 2016पर्यंत शास्त्री हे संचालक म्हणूनच संघासोत होते. त्यामुळे प्रशिक्षकाच्या अनुभवाच्या नियमानुसार शास्त्री अपात्र ठरताना पाहायला मिळत आहेत.

शोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत!

Loading...

बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. रवी शास्त्री यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. तरीही ते पुन्हा अर्ज करू शकतात. वर्ल्ड कपनंतर त्यांचा करार संपला होता. मात्र, वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्यांचा करार 45 दिवसांनी वाढवला आहे. सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शाथा रंगस्वामी यांची समिती करणार आहे. या समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने केली आहे.

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO: विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, इतर महत्त्वाच्या टॉप 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...