रोहित आणि धोनीवरच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या शोएब अख्तरनं दिलं मन जिंकणारं उत्तर
रोहित आणि धोनीवरच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या शोएब अख्तरनं दिलं मन जिंकणारं उत्तर
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रिय असतो. भारतीय टीममधील दोन दिग्गजांबद्दलचं त्याचं उत्तर चांगलंच व्हायरल झालं आहे
मुंबई, 4 जानेवारी : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रिय असतो. भारतानं मेलंबर्न टेस्ट जिंकल्यानंतर शोएबनं टीम इंडियाची जोरदार प्रशंसा केली होती. त्यानं रविवारी ट्विटरवर फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी भारतीय टीममधील दोन दिग्गजांबद्दलचं त्याचं उत्तर चांगलंच व्हायरल झालं आहे.
शोएब अख्तरचे जगभर फॅन्स आहेत. त्यामुळे त्याच्या सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सध्या चार टेस्टची मालिका सुरु आहे. जगभरातील क्रिकेट फॅन्सचं या मालिकेकडं लक्ष लागलंय. विशेषत: ‘भारतीय टीम सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणार का?’ याची सर्वांना उत्सुकता आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच टीममध्ये दाखल झाल्यानं टीम इंडियाची बाजू बळकट झाली आहे. त्यामुळे साहजिकच रोहित शर्माबद्दल शोएब अख्तरला प्रश्न विचारण्यात आला.
एका भारतीय फॅननं ‘रोहित शर्माचं एका शब्दात वर्णन कसं करणार?’ हा प्रश्न शोएबला विचारला होता. त्यावर शोएबनं ‘तो शब्द बाजारात आला की लगेच सांगतो,’ असं मिश्किल उत्तर दिलं. शोएबचं हे उत्तर भारतीय फॅन्सना आवडलं असून ते चांगलंच व्हायरल झालं आहे.
Jasay he word market main aata hai toh batata hoon.
दुसऱ्या एका फॅन्सनं शोएबला महेंद्र सिंह धोनीबद्दल (MS Dhoni) शोएबला प्रश्न विचारला. त्यावर त्यानं धोनीचं ‘एका युगाचं नाव’ असं वर्णन केलं. शोएबचं हे उत्तर देखील व्हायरल झालं आहे.
रोहित शर्मा सज्ज!
रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिली टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळणार आहे. यापूर्वीची मालिका त्याला दुखापतीमुळे खेळता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये जेवल्याबद्दलही रोहित शर्मा वादात सापडला होता. या सर्व जुन्या गोष्टींना मागं ठेवत सिडनीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे.
Published by:News18 Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.